DNA मराठी

पंचायत समितीच्या कार्यालयात विजेच्या ट्युब खेळतायेत झोका; नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता

0 92
Zoka playing electricity tubes in Panchayat Samiti office; Possibility of endangering the lives of citizens

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

श्रीगोंदा –   श्रीगोंदा तालुक्यातील पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) कार्यालयात विजेच्या ट्युब अक्षरशः झोका खेळताना दिसत आहे.  त्यामुळे नागरिक अथवा कर्मचारी यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी होताना दिसत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील पंचायत समिती म्हणजे ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयाच्या आत्मा आहे.  या पंचायत समितीच्या कार्यालयात तालुक्यातील सर्व सामान्य जनता विविध प्रकारच्या कामासाठी येत असतात त्यामुळेच सर्व कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळते मात्र पंचायत समितीच्या कार्यालयात विविध ठिकाणी विजेच्या ट्युब जोडलेल्या संचातुन बाहेर निधून झोपाळे खेळताना दिसत आहेत.  मात्र हीच एखादी ट्युब जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या तसेच पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अंगावर पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे पंचायत समितीचे अधिकारी काय? अपघात होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे मात्र गेल्या अनेक महिन्यापासून पंचायत समितीच्या कार्यालयात विविध ठिकाणी विजेच्या ट्युब लोम्बकळताना दिसत आहेत हे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का ? असाही प्रश्न विचारला जात आहे.
Related Posts
1 of 2,452
धोका झाल्यास जबाबदार कोण? 
पंचायत समितीच्या कार्यालयात विजेच्या ट्युब लटकताना दिसत आहेत त्या एखाद्या व्यक्तीच्या अंगावर पडून दुखापत झाल्यास अथवा मृत्यू ओडवल्यास त्यास जबाबदार कोण असेल असा सवाल नागरिक गटविकास अधिकारी यांना विचारताना दिसत आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: