OBC आरक्षणाशिवायच जिल्हा परिषद निवडणूक – राज्य निवडणूक  

0 166

नवी मुंबई –   सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता लवकरच  ओबीसी आरक्षणा (OBC reservation) शिवाय नागपूर, अकोला ,वाशिम ,धुळे, नंदुरबार या जिल्हा परिषदेचे आणि  33 पंचायत समितीच्या निवडणूक घेतले जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने (State elections) दिली आहे. लवकरच  या निवडणुकीचा कार्यक्रम स्थगितीच्या टप्प्यावरून पुढे सुरू केला जाणार आहे. (Zilla Parishad elections without OBC reservation – State elections)

सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार राज्य सरकार सोबत चर्चा करून  निवडणूक आयोगाने या  निवडणूका 9 जुलैला स्थगित करण्यात आल्या होत्या.  शनिवारी दि.11 सप्टेंबर रोजी  सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक रद्द करण्याचा अधिकार नसल्याचे आदेश देताच निवडणूक आयोग सक्रिय झाले असून पुढच्या 3 ते 4 दिवसात स्थगित कार्यक्रम पुढे सुरू करण्याची घोषणा होऊ शकते.

हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की  

कोरोनासंदर्भातील शासनाची अधिसूचना ही निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यापासून रोखू शकत नाही व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा आयोगाचाच आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. (Zilla Parishad elections without OBC reservation – State elections)

तर विराटला सोडावा लागणार भारतीय संघाचा कर्णधारपद ….

Related Posts
1 of 1,321
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: