तरूणांनो राजकारणत या नेतृत्व करा कॉग्रेस हा एक विचार आहे व मानवतावादी पक्ष – आ. डॉ. सुधीर तांबे

0 16

जामखेड –  देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारा हा कॉग्रेस पक्ष असून तो एक विचार आहे. या पक्षात जातीयता नसून सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा मानवतावादी पक्ष आहे त्यामुळे तरूणांनो या विचारप्रवाहात सामील व्हा राजकारणात या व नेतृत्व करा असे आवाहन पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

जामखेड शहारामध्ये  काँग्रेस बळकटीकरण सप्ताहनिमीत्त युवक काँग्रेसने चलो वार्ड अभिनयाचा शुभारंभ आ.डॉ.सुधिरजी तांबे यांच्या हस्ते करून युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा सरचिटणीस माणिकराव मोरे, युवक काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष राहुल उगले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवीदास भादलकर, जिल्हा सचिव सुनील शिंदे, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष फिरोज पठाण,  युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवराजे घुमरे, नवनिर्वाचित कॉंग्रेस जिल्हा सचिव जमीर सय्यद, तालुका उपाध्यक्ष कुंडल राळेभात, विद्यार्थी काँग्रेस तालुकाअध्यक्ष बळिराम पवार, अनिकेत जाधव, अनिल अडाले, उमेश माळवदकर आदी उपस्थित होते.

अखेर भास्करराव पेरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल ……..

यावेळी बोलताना डॉ सुधीर तांबे प्रदेशाध्यक्ष बदलावर म्हणाले, नामदार बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री, प्रदेशाध्यक्ष व विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत अशा अनेक जबाबदा-या असल्याने श्रेष्ठींना प्रदेशाध्यक्ष बदल करायचा निर्णय घेतला असेल असे बदल पक्षपातळीवर होतच असतात त्यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर आनंदच होईल अगामी नगरपरिषद निवडणुकीबाबत बोलताना आ. डॉ. तांबे म्हणाले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जामखेड नगरपरिषदेसाठी आम्ही सर्वजण बसून निर्णय घेऊ सन्मानाने जागा वाटप होतील तसे झाले नाही तर स्वबळाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्य़ात युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत अ दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार देऊन युवकांत राजकीय जनजागृती केली तसेच संगणकीय ज्ञान देऊन देशाला प्रगतीपथावर नेले आहे असे डॉ. तांबे म्हणाले.

Related Posts
1 of 1,301

                  राज्याच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप ? देवेन्द्र फडणवीस यांचे मोठं वक्तव्य

यावेळी ज्ञानदेव वफारे व कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी मार्गदर्शन केले यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी शहर युवक काँग्रेस व प्रभाग निहाय कार्यकारीणी जाहीर करून त्यांना पत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल गिरमे यांनी केले तर आभार आदीत्य उगले यांनी मानले.

 पोलीस अधीक्षकांचा दणका ,अखेर पाटील निलंबित …………..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: