जिल्ह्यात जमीनीच्या वादातून युवकांनी केली आत्महत्या.., गुन्हा दाखल

0 300

श्रीगोंदा :   तालुक्यातील येवती येथे राहणाऱ्या  गौतम भानुदास आढाव (४०) यांनी घरामागील आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.  (Youth commits suicide due to land dispute in the district)

याबाबत अधिक माहिती अशी कि ,येवती येथील शेतकरी गौतम भानुदास आढाव यांचे चुलत भाऊ रामदास पोपट आढाव यांच्याशी जमिनीच्या व्यवहारावरूनमागच्या सहा महिन्यापासून वाद सुरु होते. गौतम आढाव यांच्या नावावरील गट. नं. ३५८ मधील दिड एकर क्षेत्र रामदास आढाव आणि इतर जणांनी फसवून करून खरेदी करून घेतले. यासंदर्भात कौटुंबिक बैठक झाली तेव्हा एक महिन्याच्या आत २१ लाख रुपये द्या आणि जमीन घ्या नाहीतर काहीही करा तुम्हाला जमीन मिळणार नाही, असे म्हणून वेळोवेळी मयत गौतम आढाव यांना मानसिक त्रास दिल्यामुळे अखेर त्यांनी  आत्महत्येचा मार्ग स्विकारत चुलत भाऊ रामा आढाव याच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

Dysp संदीप मिटके यांचे पथकाची औरंगाबाद जिल्ह्यात धडाकेबाज कामगिरी

Related Posts
1 of 1,608

तसेच त्यांच्याजवळ याच मजकूराची चिट्ठी ही पोलीस प्रशासनाला मिळाली असून मयताची पत्नी छाया गौतम आढाव यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात रामदास पोपट आढाव, दादा पोपट आढाव, पोपट सखाराम आढाव आणि जिजाबाई पोपट आढाव या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश बोराडे हे करीत आहेत.  (Youth commits suicide due to land dispute in the district)

हे पण पहा –  मी नव्हे  तो पुन्हा येईल… ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: