आपला गर्व जरा खिशात ठेवायला हवा…. कोहलीवर भारताच्या माजी क्रिकेटपटूची टीका

0 221

 लीड्स-   इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेचा तिसरा सामना काल दि. २५ ऑगस्ट पासून सुरु झाला असून तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय पहिला डाव  ७८ धावांवर संपुष्टात आला . भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने या डावात अवघ्या ७ धावा करुन माघारी परतला त्याला इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसन (James Anderson) च्या गोलंदाजीवर कोहली यष्टीरक्षक जोस बटलरकडे झेल देऊन बसला आणि तंबूत दाखल झाला. मागच्या ५० डावात कर्णधार विराट कोहली ला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश येत आहे. यामुळे अनेक माजी  क्रिकेटपटू त्याच्या वागणुकीवरून टीका करत आहे. (Your pride should be put in a little pocket …. The criticism of India’s former cricketer on Kohli)

लीड्सवर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीआधी विराट कोहलीनं माध्यमांशी संवाद साधताना इंग्लंडच्या धरतीवर तुम्हाला तुमचा गर्व खिशात ठेवायला हवा असं विधान केलं होतं. याच विधानावरुन भारताचे माजी क्रिकेटपटू मनिंदर सिंग (Maninder Singh) यांनी कोहलीला त्यानंच दिलेला सल्ल्याची आठवण करुन दिली आहे. कोहलीनं आपला हट्ट जरासा बाजूला ठेवून खेळपट्टीवर जास्तीचा वेळ देण्याचा प्रयत्न करायला हवा, असं मनिंदर सिंग म्हणाले.

विराट जर त्याच्या नेहमीच्या अंदाजानुसार दबाव निर्माण करुन खेळू इच्छित असेल तर लीड्सची खेळपट्टी त्यास योग्य नाही हे त्यानं लक्षात घ्यायला हवं. आक्रमक फलंदाजी येथं करता येणार नाही. त्यानं खेळपट्टीवर जरा वेळ व्यतित करायला हवा. याआधीच्या दौऱ्यात ज्यापद्धतीनं खेळपट्टीवर वेळ घालवून जवळपास ६०० धावा त्यानं केल्या होत्या. खेळपट्टीच्या गतीचा एकदा अंदाज आला की तुम्ही निर्भयतेनं खेळू लागता, असं मनिंदर सिंग म्हणाले. एक पाय पुढे ठेवून शॉट्स खेळण्यासाठी ही काय भारतीय खेळपट्टी नाही. कोहलीनं सांगितलं होतं की अभ्यास करण्याची गरज आहे. त्याच पद्धतीने त्यानं आपला गर्व जरा खिशात ठेवायला हवा आणि खेळायला हवं, असं रोखठोक विधान मनिंदर सिंग यांनी केलं आहे. कोहली सातत्यानं एकाच प्रकारची चूक करत असल्यानं संताप व्यक्त होत असल्याचेही ते म्हणाले.

हे पण पहा – तहसीलदार यांच्या अडचणीत वाढ, तहसीलदार यांची बदली करा नाहीतर आमची बदली करा – महसूल व तलाठी संघटना

Related Posts
1 of 65

इंग्लंडविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत कोहलीनं चार डावांमध्ये १७.२५ च्या सरासरीनं केवळ ६९ धावा केल्या आहेत. नॉटिंघममध्ये अनिर्णित राखल्या गेलेल्या कसोटीतही कोहली काही खास कामगिरी करू शकला नव्हता. पहिल्या डावात कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. जेम्स अँडरसनने कोहलीची विकेट घेतली होती. तर लॉड्समध्ये कोहलीनं पहिल्या डावात ४२ आणि दुसऱ्या डावात २० धावा केल्या होत्या.(Your pride should be put in a little pocket …. The criticism of India’s former cricketer on Kohli)

देशाला मिळणार पहिल्या महिला सरन्यायाधीश ? “त्या ” ९ नावांना केंद्राची मंजुरी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: