एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू

चंद्रपूर – एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने केलेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीने अखेर सोमवारी जीव सोडला. प्रफुल्ल प्रकाश आत्राम (३२) याने अल्पवयीन युवतीला रस्त्यात गाठून प्रेमाची गळ घातली. मात्र त्याच्यावर प्रेमच नसल्याने तिने त्याला नकार दिला. काही कळायच्या आतच त्याने तिच्या पोटात चाकू भोसकला. ९ सप्टेंबर रोजी रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. (Young woman stabbed to death during treatment)
ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखम खोलवर असल्याने नागपूरला हलविले. ती मृत्यूशी झुंज देत होती. पाचव्या दिवशी तिची झुंज अपयशी ठरली. तिने नागपुरातच उपचारादरम्यान जगाचा निरोप घेतला. प्रफुल्लविरुद्ध कलम ३०२ दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वनश्री ही चंद्रपूर येथील जटपुरा गेटजवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करीत होती. तिच्या घराचे काम सुरू असताना प्रफुल्ल त्या कामावर होता. एवढीच त्यांची ओळख होती. प्रफुल्ल वनश्रीवर एकतर्फी प्रेम करू लागला. तो अनेकदा तिचा पाठलाग करीत होता.
हे पण पहा –किरीट सोमय्या यांना देणार करारा जवाब | मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलवली तातडीची पत्रकार परिषद
१ सप्टेंबरला रात्री त्याने तिला व तिच्या मैत्रिणीला शिवीगाळ केली. वनश्रीने रामनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून दुर्लक्ष केले. ९ सप्टेंबरला प्रफुल्लने तिला एकांतात गाठले व चाकू काढून वनश्रीच्या पोटावर एकापाठोपाठ तीन घाव घातले. (Young woman stabbed to death during treatment)
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार