प्रेमप्रकरण उघड केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

0 256
A man from the tribal community was beaten to death for not leaving the tempo planted in the company's yard.

 

संगमनेर – तालुक्यातील वरंवडी येथील प्रशांत संजय केदारी (वय २९) या तरुणाला प्रेम प्रकरण (love affair) उघड केल्यामुळे चौघा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत मुंबई येथे दाखल केलेला गुन्हा आश्वी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वरंवडी गावच्या शिवारात दि. ३१ मे रोजी ४.३० च्या सुमारास शंकर भास्कर दळवी, गणेश दत्तात्रय साखरे, मच्छिंद्र साळवे व नवनाथ उत्तरेश्वर मुळे (सर्व रा. भोसरी, ता. पिंपरी चिंचवड, जि. पुणे) यांनी प्रवेश करत येथील प्रशांत सज्य केदारी या तरुणाच्या घरात घुसून तू आमच्या पाहुण्याच्या मुंबई येथील घरी जाऊन तुमच्या पत्नीबरोबर सात वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे सांगून मोबाईल मधील माहिती त्याच्या मोबाईलवर का पाठवली? तू आमच्या बरोबर मुंबईला चाल व त्यांना हे सर्व खोटे असल्याचे सांग असे म्हणत गणेश साखरे याने शिवीगाळ केली.

 

Related Posts
1 of 2,177

यावेळी या चौघांनी प्रशांत केदारी याला त्याच्याकडील एम. एच. १४ बीके. ६६२५ या तवेरा गाडीत बळजबरीने बसवले. यावेळी प्रशांत केदारी याने आरडाओरड करण्यास सुरवात केल्याने चौघांनी त्याला लाथाबुक्यांसह टामीने मारहाण करुन जखमी केले. तसेच आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे देवनार पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ००/२०२२ नुसार भादंवि कलम ४५२, ३६५, ३२४, ३२३, ५०४, ५०६, (२) ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. डी. साळुंखे व पोलीस हवालदार आर. एस. पाटील यांनी याबाबत रिपोर्ट आश्वी पोलीस ठाणे सादर केल्यानंतर आधी येथे सदर गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता, ६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक शिंदे हे पुढील तपास करत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: