श्रीगोंदयात यात्रेला दोन ठिकाणी गालबोट: एकीकडे तुफान मारामारी तर दुसरीकडे दगडफेक

प्रतिनिधी – DNA मराठी टीम
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यात भैरवनाथ यात्रेनिमित्त आणलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात धिंगाणा वडघुल येथील परस्परविरोधी तक्रारी दाखल तसेच चांडगाव या ठिकाणी दडफेक झाली मात्र याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
श्रीगोंदा तालुक्यात काल दि 24 रोजी तालुक्यातील वडघुल आणि चांडगाव या ठिकाणी ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची सालाबादप्रमाणे यात्रा भरविण्यात आली दोन्ही ठिकाणी देवाची पूजा अर्चा करून यात्रा मोठ्या दिमाखात साजरी झाली सायंकाळी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतल्यावर वलघुड मध्ये नेहमीप्रमाणे लोककलावंताचा कार्यक्रम म्हणजे तमाशा ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सुरवातीला गावकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून तमाशा सुरू केला जातो परंतु या गावात दोन राजकीय पार्ट्या असल्याने त्या ठिकाणी नारळ फोडण्याच्या तसेच जुन्या शेतीच्या किरकोळ कारणातून दोन्ही पार्ट्या मध्ये तमाशाच्या स्टेजवर तुफान मारामारी झाली यातून दोन्ही राजकीय पार्ट्या मधील लोकांवर परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
Related Posts
पहिल्या फिर्यादी मध्ये श्रीराम सर्जेराव कळमकर वय 32 वर्षे धंदा शेती रा. वडघुल यांच्या फिर्यादीवरून शेतीच्या जुन्या वादाचे कारण पुढे करून तमाशाच्या ठिकाणी गोंधळ केल्याने अनिल रामदास कळमकर , सचिन अनिल कळमकर ,शरद सुदाम कळमकर , दत्तात्रय रामदास कळमकर सर्व रा. वडघुल ता.श्रीगोंदा व सागर माणिक ढोरजकर रा ढोरजा यांच्यावर भा.द.वि.क.143,147,149,324,323,504 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले तर दुसरीकडे फिर्यादीचे रामदास यशवंत कळमकर वय 65 वर्षे धंदा शेती रा. वडघुल यांच्या फिर्यादीवरून जमिनीचा जुना वाद मनात धरून तमाश्याच्या ठिकाणी गोंधळ घातल्याने सर्जेराव नाना कळमकर, श्रीराम सर्जेराव कळमकर,गहीनीनाथ सर्जेराव कळमकर सर्व रा. वडघुल यांच्यावर भा.द.वि.क.324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही घटनांचा तपास स.फौ.नवले हे करत आहेत तर चांडगाव या ठिकाणी आर्केस्ट्रा मध्ये गाणे लावण्याच्या किरकोळ कारणातून दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत त्यांचेवर उपचार सुरू आहेत मात्र गावातील सर्व नागरिकांनी हा वाद गावात एकत्र बसून मिटविण्यासाठी प्रयत्न केल्याने हा वाद गावातच मिटला मात्र याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.