प्रतिनिधी- DNA मराठी टीम
श्रीगोंदा ;- श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी येत्या २५ तारखेला गावचे ग्रामदैवत भैरवनाथ या देवाची यात्रा भरते या यात्रेनिमित्त गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यात्रेच्या दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे सामने हे एक वैशिट्यपूर्ण आकर्षण या ठिकाणी पाहण्यास मिळते.
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ या देवाची दरवर्षी सालाबादप्रमाणे यात्रा भरते या दिवशी भैरवनाथ यांची मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा केली जाते सायंकाळी ५ चे सुमारास या यात्रेनिमित्त गाडे ओढण्याची अनेक वर्षांपासून परंपरा आहे त्यानंतर सायंकाळी पैपाहुणे यांच्या शेरण्या व देवाचा छबिन्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो नंतर रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे सामने आयोजित केले जातात.
यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या मधून मोठ्या प्रमाणात मल्ल येतात यावेळी यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले असून यामध्ये प्रथम बक्षीस ७१ हजार रुपयांचे असून हा सामना अकलूज येथील सुप्रसीध्द मल्ल सचिन केचे व कुर्डुवाडी येथील दादूमिया मुलांनी तर दुसरे बक्षीस ५१ हजार असून तालुक्यातील काष्ठी येथील सुरेश पालवे आणि विहाळ येथील किरण मिसाळ यांच्यात होणार आहे तर तिसरे बक्षीस ३१ हजार असून कुर्डुवाडी येथील मोईन पटेल व कर्जत येथील मनदीप रावल यांच्यात होणार आहे.
तर बक्षीस २५ हजार असून कुर्डुवाडी येथील अमित सूळ व कोल्हापूर कलीम मुलांनी तर पाचवे बक्षीस २१ हजार असून तालुक्यातील काष्ठी येथील आण्णा गायकवाड व दीपक रावल कर्जत येथील मल्ल यांच्यात होणार आहेत तर सहावे बक्षीस २० हजार रुपये असून त्यासाठी टाकळी कडे मधील सुपुत्र रोहित वाळुंज व अनिल पवार ढोकराई यांच्यात होणार असून यांच्याबरोबर अनेक जंगी कुस्त्या होणार आहेत अशी माहिती यात्रा कमिटीच्या सद्श्यानी दिली आहे तसेच या सर्व जंगी कुस्त्याच्या सामन्याचा सर्वानी आस्वाद घ्यावा असे आवाहन सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष व सरपंच पती विजयराव शेंडे यांनी केले आहे.