DNA मराठी

श्रीगोंदयात उपविभागीय दक्षता नियंत्रण समितीची कार्यशाळा पार

0 217
Workshop of Sub-Divisional Vigilance Control Committee held in Shrigonda

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

श्रीगोंदा-  श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील पंचायत समितीच्या धर्मवीर संभाजी महाराज सभागृहात आज रोजी उपविभागीय दक्षता नियंत्रण समितीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

Related Posts
1 of 2,482
श्रीगोंदा तालुक्यातील पंचायत समितीच्या धर्मवीर संभाजी महाराज सभागृहात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधकअत्याचार प्रतिबंधक 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती श्रीगोंदा पारनेर यांच्या कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील वैभव गीते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी अनेक प्रमुख वक्त्यांची मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले हे होते.
 त्यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी बोलताना वैभव गीते यांनी सांगितले कायद्याविषयक महत्त्वाचे ज्ञान देण्यात आले त्याचबरोबर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा वापर गैरसमज गैरवापर याविषयी लोकांमध्ये कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यामुळे प्रशासनाने शिक्षेचे प्रमाण वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारित कायद्यानुसार पूजनीय वस्तू अथवा व्यक्ती च्या विटंबनेचा गुन्हा दाखल होऊ लागला बहिष्कार टाकणे हा ही एक गुन्हा आहे जातीचा दाखला असल्याशिवाय इतर समाज्याच्या साक्षीदार पाहिजे असे अनेक गैरसमज समाज्यात पसरवले आहेत त्यामुळे या प्रकारामध्ये पोलिसांची महत्वाची भूमिका बाजवतात अनुसूचित जाती जमाती कायदा कोणाच्या विरोधात नाही त्यामुळे या कायद्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे गावलेव्हल च्या पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक या  लोकांनी यामध्ये प्रामुख्याने लक्ष घातले तर अश्या गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल  या गुन्ह्यामध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती प्रांताधिकारी यांनी केली तर नक्कीच शिक्षेचे प्रमाण वाढेल कायद्याच्या चुकीचा वापर केला तर कारवाई फिर्यादी वरही होते असेही गीते यांनी बोलताना सांगितले.
 या कार्यक्रमाला प्रांताधिकारी सुधाकर भोसले तहसीलदार मिलिंद कुलथे, उपविभागीय पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,कायदेतज्ञा घोडके ,रमेश जठार त्याचबरोबर तालुक्यातील उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सर्व सदस्य त्याचबरोबर पोलीस पाटील ग्रामसेवक सरपंच पत्रकार बांधव आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: