हद्द निश्चित झाल्याशिवाय रस्त्याचे तसेच गैस पाईपलाईनचे काम सुरू करू नये – प्रहार संघटना

0 282

श्रीगोंदा :  श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव, होलेवाडी, शेंडगेवडी, श्रीगोंदा, या परिसरातील शेतकऱ्यांच्या गट क्र.१३३, १८९, १९०, १९२, १८८, २२२२, २२८९, २२५०, २२२४ या शेतातून जाणाऱ्या राष्ट्रिय महामार्ग ५४८ चे सुरू असलेले काम तसेच रस्त्याच्या कडेने भारत गॅस रिसोर्स कंपनी चे गॅस पाइपलाइन चे काम नियमाप्रमाणे नसून या कामाच्या ठेकेदारांनी शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरील झाडे अनाधिकरणे तोडल्या प्रकरणी शेतकऱ्यांनी दि.१२ ऑगस्ट तसेच ९ सप्टेंबर रोजी उपोषणाचे निवेदन दिले.

 तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सदर रस्त्याची मोजणी करून पुढील काम सुरू करणे बाबत उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांना सूचना केल्या होत्या. मात्र २४ सप्टेंबर रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ करत त्यांना धमकी देत दहशतीचे वातावरण तयार करत काम सुरू केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी तसेच हद्द निश्चित झाल्याशिवाय काम सुरू करू नये यासाठी प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह शेतकरी दि. २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविले आहे.
Related Posts
1 of 1,603
निवेदनावर प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर, निलेश कुरुमकर, राहुल कुरूमकर, सुलोचना होले, मच्छिंद्र शेंडगे यांच्या अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: