महिला दिनानिमित्त छत्रपती महाविद्यालयात महिला सौरक्षणाचे धडे

0 9

 श्रीगोंदा  :-  श्रीगोंदा शहरातील छत्रपती महाविद्यालयात आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्वरक्षणाचे धडे याबाबत कराटे प्रशिक्षक यांच्या मध्यातून दाखविण्यात आले त्यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक रामराम ढिकले यांनी  कायद्याच्या संदर्भात  मुलींना मार्गदर्शन केले

आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन याचे अवचित्त साधून छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात कराटे प्रशिक्षक संजय  आनंदकर यांच्या कराटे ग्रुप च्या वतीने महिला सौरक्षणाचे धडे देण्यात आले त्यामध्ये महिलांची होणारी छेडछाड तसेच त्यापासून वाचण्याचे प्रकार तसेच पर्स चोरी करणाऱ्या लोकांपासून वाचणे तसेच इतर वेळी आपला बचाव कसा करावा याचे मार्मिक उदाहरण देण्यात आले .
त्यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले की महिला सौरक्षणाची मोठ्या प्रमाणात गरज आहे  त्यातून महिला सक्षमीकरण गरजेचे आहे आज महिला सर्वच क्षेत्रात करिअर करत आहे त्यामुळे अनेक महिला सक्षमीकरण झाले आहेत त्यासाठी सरकारने अनेक कायदे केले आहेत त्यात अनेक मोठे कायदे केले आहेत त्यांची कडक अंमलबजावणी केली जाते तसेच कायद्याच्या आबेज व्याख्या बदलण्यात आले आहेत त्यातून पोक्सो सारखे अनेक प्रकार कमी झाले आहेत मात्र आजही महिलांचा वापर करून खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार थांबले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले  मात्र काही वेळा प्रकार घडूनही महिला समोर येत नाही त्यामुळे आरोपी याचा काळ सोकावला जातो त्यामुळे वेळीच हा प्रकार थांबतो पण अनेक मुली घाबरतात असे  झाले नाही पाहिजे .
Related Posts
1 of 1,290
जर भीती वाटत असेल तर तक्रार पेटीमध्ये तक्रार टाका आम्ही त्यावर कारवाई करू  असेही त्यांनी सांगितले तसेच बोलताना ते म्हणाले की किरण बेदी याचा आदर्श देत त्यांनी शारीरिक क्षमता सुध्दा गरजेची आहे बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढविण्याची महिलांनी गरज आहे यावेळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर,महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यवंशी, पत्रकार उत्तम राऊत,दादा सोनवणे, योगेश चंदन आदी मान्यवर मंंडळी उपस्थित होते .
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: