दारू बंदीसाठी महिलांचा पुढाकार,कारवाई न झाल्यास आंदोलन करणार..

0 207
श्रीगोंदा  :  तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे अनधिकृत दारू विक्री चालू असून,प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कार्यक्षेत्रात अवैध व्यवसायांचे प्रमाण वाढत चालले आहे.दारू पिऊन गावामध्ये दहशत निर्माण करणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. यापासून साधारण माणसांना आपला जीव मुठीत धरून,जीवन व्यतीत करावे लागत आहे.यावर पर्याय म्हणून,टाकळी कडेवळीत येथील महिलांनी पुढाकार घेत,गावातील दारू बंदी साठी श्रीगोंदा पोलीस स्टेशन सह ग्रामपंचायला दारूबंदी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.(Women’s initiative for banning alcohol, if no action is taken, they will agitate.)
Related Posts
1 of 1,608
दिलेल्या निवेदना प्रमाणे दिनांक 23 आगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभे मध्ये,”आपले गावात संपूर्ण दारू विक्री बंद करणेबाबत” अश्या विषयाच्या अनुषंगाने सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला आहे.यानुसार श्रीगोंदा पोलीस निरीक्षकां सह सरपंच टाकळी कडेवळीत यांना या  विषयीचे पत्र देण्यात आले आहे.ज्यात गावात पूर्ण दारू विक्री बंद करणे अत्यंत गरजेचे आहे.दारुडे गावात दारू पिऊन नंगा नाच करीत आहेत.दारू पिऊन त्यांचे संसार सुद्धा उध्वस्त झाले आहेत.काही युवक दारू पिऊन मरण पावले आहेत.अतिशय गंभीर अवस्था दारुमुळे या गावात झालेली असून,गावात कुणालाही दारू विक्री करण्याचे कायदेशीर परवाने नाहीत.तरीही,दारू विक्री सर्रासपणे चालू आहे.
याला जबाबदार कोण? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.या गावातील अनेक महिलांच्या सह्या आहेत स्थानिक प्रशासनाने त्वरित दारू विक्री बंद करावी. असे पत्र देण्यात आले आहे.कारवाई न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे ही स्पष्ट होत आहे.यानंतर,प्रशासनाने स्थानिक दारू विक्री करणारांना बोलावीत,तात्काळ हे धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे समजते आहे.(Women’s initiative for banning alcohol, if no action is taken, they will agitate.)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: