भाजपामध्ये महिलांचा सन्मान होत नाही- भाजप आ. मंदा म्हात्रे

0 260
नवी मुंबई –   भारतीय जनता पक्षात (BJP) महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप करत भाजपा आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री (Minister for Women and Child Welfare) यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यापुढेच मंदा म्हात्रे यांनी आपली ही खंत बोलून दाखवली. दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतरही पक्षाकडून डावललं जात असल्याचा आरोप ही यावेळी मंदा म्हात्रे यांनी केला .

दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतर, कर्तृत्त्व सिद्ध करून दाखवून सुद्धा पक्षाकडून डावललं जातं असं म्हणत मंदा म्हात्रे यांनी यशोमती ठाकूर यांच्यासमोर आपल्या पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. मंदा म्हात्रे यावेळी म्हणाल्या, महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटलं गेलं. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझं काम होतं, माझं कर्तृत्त्व होतं. पण महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत असे प्रकार होतात.

हे पण पहा – आमदारांच्या दबावातून गुन्हा, काळेंनी दाखवली सीडी पुन्हा दिले जाहीर आव्हान

मंदा म्हात्रे यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या कि, मी कोणालाही घाबरत नाही. मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. इतर पक्ष असतात ना आपल्याला साथ द्यायला. राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात, अशी खंतसुद्धा मंदा म्हात्रे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.

आहो सरपंच दारूबंदी नावाला …, दारू तर मिळतेय गावाला ..

Related Posts
1 of 1,635
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: