कुटुंबाला मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक

0 438

नेवासा –   नवऱ्याला व मुलाला जिवे मारण्याची धमकी देत शहरातील एका 30 वर्षीय महिले (Woman) वर वारंवार अत्याचार (Rape) केल्याप्रकरणी अशोक हेंद्रे याच्या विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक देखील करण्यात आली.

मिळालेली माहिती अशी की पीडित महिले (Woman) चे पती एका कंपनीत नोकरीस असल्याने दिवसभर सदर महिला व मुलगा हे दोघे  घरी असतात. चार ते पाच महिन्यांपूर्वी पीडित महिलेचे पती कंपनीत गेले असता दुपारी शेजारी राहणारा अशोक हेंद्रे हा घरात आला व महिलेबरोबर अश्लील भाषेत बोलू लागला व महिलेस कवळ घातली. त्याला दूर लोटले असता त्याने शिवीगाळ करत नवऱ्याला मारून टाकीन व तुम्हाला इथे राहू देणार नाही, अशी धमकी दिल्याने महिला घाबरून गेली.

त्यावेळी सदर महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला व सदर प्रकार बाहेर सांगितला तर नवऱ्याला व मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वारंवार हेंद्रे याने पीडित महिलेचा पती घरात नसताना बळजबरीने महिलेवर अत्याचार केले.

अंगणात आलेल्या कोंबडी सोबत इसमाने केले असे कृत्य की..त्यावर गुन्हा दाखल झाला

Related Posts
1 of 1,608

दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी सदर महिलेचे पती सुट्टी असल्याने गावाकडे गेल्याने दुपारी बाराच्या सुमारास हेंद्रे हा घरात आला व मुलास धमकावले घराबाहेर काढून दिले. पुन्हा महिलेवर अत्याचार केला. सदर प्रकारामुळे पीडित महिला घाबरून गेल्याने मुलासह माहेरी गेली. पती गावाकडून आल्यानंतर सदर घडलेला प्रकार पतीस सांगितला, असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अशोक हेंद्रे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली  आहे. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील करत आहे.

 हे पण पहा – धक्कादायक.. अल्पवयीन मुलीचे अपहरण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: