डेटिंग अ‍ॅपवर लग्नाच्या आमिष दाखवून महिलेची 73 लाखांना फसवणूक

0 188

पिंपरी चिंचवड-     देशासह राज्यात मागच्या काही दिवसांपासून ऑनलाईन (Online)  पद्धतीचा वापर करून फसवणूक ( Cheated ) करण्याच्या गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया अँप (Social Media App) चा वापर करून ही फसवणूक केली जात आहे. असाच एक गुन्हा पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील वाकड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. एका आयटी अभियंता असलेल्या महिलेला ‘टिंडर’ (Tinder) या डेटिंग अँप (Dating App) वर लग्नाचा अमिष दाखवून तब्बल 73 लाख 59 हजार 530 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित 35 वर्षीय आयटी अभियंता महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Woman cheated of Rs 73 lakh by showing marriage lure on dating app)

या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी की 35 वर्षीय आयटी अभियंता महिला बरोबर या प्रकरणात आरोपी असलेला सिद्धार्थ रवी याने टिंडर’ या डेटिंग अँप वर ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला. तसेच महिलेशी लग्न करण्याचे आणि भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने महिलेला महागडे गिफ्ट पाठवून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर तिला भेटण्यासाठी भारतात आल्याचे सांगितले. त्याच्याकडे एक कोटी रुपयांची मोठी रक्कम असल्याने त्याला दिल्ली विमानतळावर कस्टम ऑफिसरने पकडले असल्याचे त्याने फिर्यादी महिलेला सांगितले.

एक लाखाच्या लाचेची मागणी, पोलीस निरीक्षकावर एसीबीची कारवाई

Related Posts
1 of 1,481

इतकी मोठी रक्कम सोडवण्यासाठी वेगवेगळे चार्जेस, दंड, जीएसटी तसेच इतर अनेक कर भरायचे आहेत, अशी विविध कारणे सांगितली. त्यानंतर वेगवेगळ्या बँकांचे खाते नंबर देऊन त्यावर फिर्यादीला 73 लाख 59 हजार 530 रुपये भरण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी महिलेने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे अर्ज करून तक्रार केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. (Woman cheated of Rs 73 lakh by showing marriage lure on dating app)

हे पण पहा – बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील | खासदार विखेंचा घणाघात

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: