धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेला अटक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0 334
Woman arrested for blackmailing Dhananjay Munde; Learn the whole case
प्रतिनिधी – DNA मराठी टीम
मुंबई  –  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  (Dhananjay Munde) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पाच कोटी रुपये द्या नाहीतर तुमच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी धमकी एका महिलेने त्यांना दिली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात या महिलेविरूद्ध तक्रार दाखल केली होती.
Related Posts
1 of 2,107

तक्रार दाखल होताच मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेला ताब्यात घेतले आहे. मुंबई क्राईम ब्रांच व इंदूर पोलिसांनी एकत्र कारवाई करत मुंडेंना ब्लॅकमेल ( blackmailing) करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेला मध्य प्रदेशातील इंदूरमधून अटक केली आहे.

रेणू शर्मा या महिलेने जानेवारी महिन्यात देखील धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी ती तक्रार मागे देखील घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा धनंजय मुंडेंकडे 5 कोटींची व महागड्या मोबाईलची देखील मागणी केली. मला पैसे दिले नाही तर तुमच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करेन व सोशल मीडियावर बदनामी करेन, अशी धमकी दिल्याची तक्रार मुंडेंनी केली होती.

दरम्यान, रेणू शर्मा या सामाजिक कार्यकर्त्या करूणा शर्मा यांची बहिण असून एक गायिका आहेत. रेणू शर्माच धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानूसार पोलिसांनी रेणू शर्माला अटक केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: