आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलचं निधन; अनेक चर्चांना उधाण

0 357
Witness in Aryan Khan drugs case Prabhakar Sail dies; Many discussions abound

मुंबई –   कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलीवूडचा (Bollywood) किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात अनेक नाव चर्चेत आली होती. त्यापैकी एक नाव म्हणजे प्रभाकर साईलचा होता. या प्रभाकर साईल (Prabhakar Sail) शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. (Witness in Aryan Khan drugs case Prabhakar Sail dies; Many discussions abound)

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ११ वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्याच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असं सांगण्यात येत आहे. ही माहितीसमोर येताच सोशल मीडियावर (Social Media) अनेक चर्चंना उधाण आले आहे.

Related Posts
1 of 2,524

प्रभाकर हा किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड होता. इतकंच नाहीतर त्याच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्थादेखील किरण गोसावी यांच्याकडेच होती. बॉलिवूड स्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला सोडवण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोपही प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता. यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार म्हणून प्रभाकर साईल यांच्यासह काही जणांनी काम केलं होतं.(Witness in Aryan Khan drugs case Prabhakar Sail dies; Many discussions abound)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: