Without wearing a blouse, Prajakta Mali took a photo of him.Without wearing a blouse, Prajakta Mali took a photo of him.
मुंबई – सोशल मीडियावर (Social Media) नेहमी काहींना काही कारणाने सतत चर्चेत असणारी मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) होय. छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात करणारी या अभिनेत्रीने आपल्या महेनतीवर आज मराठी सिनेसृष्टीमध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससाठी नेहमी काहींना काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या फॅन्स साठी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

 

https://www.instagram.com/p/CdKltZ2LsAL/

या फोटोमध्ये प्राजक्ता वेस्टर्न लूकमध्ये सुंदर दिसतेच. पण त्यापेक्षाही तिला पारंपरिक लूकमध्ये पाहणं नेटकरी पसंत करतात. नव्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. आता तिने साडी नेसून फोटोशूट करत ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण प्राजक्ताने ब्लाऊज परिधान न करताच साडी नेसली आहे. साडी नेसताना ब्लाऊज परिधान न करणं ही कसली फॅशन असा प्रश्न अनेकांना पडला. तसेच तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करणाऱ्यासही सुरुवात केली.

 

 

‘प्राजक्ता ब्लाऊज परिधान करायला विसरलीस का?’ असा प्रश्न नेटकरी तिला कमेंट्सच्या माध्यमातून विचारत आहेत.  या फोटोमध्ये तिने आसामी सिल्क साडी परिधान केलेली दिसत आहे. तसेच साडीवर लाल आणि निळ्या रंगाचं वर्क पाहायला मिळत आहे. प्राजक्ताने परिधान केलेले दागिने विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत.

 

https://www.instagram.com/p/Cc9tdwSLEJ9/

 

‘जुळून येती रेशीम गाठी’ या मराठी मालिकेमुळे प्राजक्ता प्रकाशझोतात आली. या मालिकेनंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. आता ती ‘हास्य जत्रा’ या कॉमेडी कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *