प्रियसीने आत्महत्या केल्याने काही तासातच प्रियकराने गळफास घेऊन संपवला जीव

0 208

अहमदनगर –  जामखेड (Jamkhed ) तालुक्यातील आपटी या ठिकाणी अल्पवयीन प्रियसी (girlfriend) मुलीच्या आत्महत्या (Suicide) नंतर काही तासातच प्रियकर (boyfriend ) मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी दोघा अल्पवयीन मुलगी व मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र दोघांनी आत्महत्या का केली या बाबत अद्याप माहिती समजु शकले नाही. अशोक बंडु कडु (वय १७) रा. आपटी आत्महत्या केलेल्या अल्पवयीन प्रियकराचे नाव आहे. (Within hours of girlfriend committing suicide, her boyfriend strangled her to death)

या बाबत समजलेली माहिती अशी की बुधवार दि २४ रोजी जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी प्रियसी मुलगी  हीने दुपारी बारा ते एकच्या दरम्यान. मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती माहिती याच गावात राहणार्‍या तिचा प्रियकर अशोक बंडु कडु यास समजली यानंतर आपल्या प्रियसीने नक्की आत्महत्या केली आहे का? याची खात्री करण्यासाठी तो प्रियकर अशोक कडु हा मुलीच्या घरी गेला त्या वेळी आपल्या प्रियसीने आत्महत्या केली आसल्याचे समजले.

मोठी बातमी ! जिल्‍ह्यात कलम 144 लागू, जाणून घ्या संपूर्ण माहीती

Related Posts
1 of 1,481

या नंतर सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला या नंतर तीचा प्रियकर अशोक कडु या मुलाने देखील व्हॉटसप वर मी देखील माझे जीवन संपवत आहे असा स्टेट्स ठेवला होता आणि जे व्हायचे तेच झाले. त्याच दिवशी काही तासातच म्हणजे दुपारी तीनच्या दरम्यान मुलाने देखील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या बाबत दोघांनीही आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नसुन दोघांचे प्रेम संबध होते अशी माहिती समोर आली आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सपोनि सुनिल बडे, पो. ना संभाजी शेंडे, पो. कॉ. शशी मस्के व पो. कॉ. संजय जायभाय यांनी भेट दिली.पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलीने आत्महत्या केल्यावर मुलीकडील मंडळी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत होते. पण एका तासात मुलानेही आपली जीवनयात्रा संपवली आहे .(Within hours of girlfriend committing suicide, her boyfriend strangled her to death)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: