एटीएम मधून पैसे काढणे महागणार, जाणुन घ्या नविन नियम

0 322

 नवी मुंबई –   नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक बँकांनी (Bank) व्यवहाराचे नियम बदलले आहेत. हे नविन नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत. तीन मोठ्या खासगी बँकांशिवाय इंडिया पोस्‍ट बँक ने देखील ट्रॅंजेक्‍शनच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या बँकेतूनच फक्‍त ४ ट्रँजॅक्शनच फक्‍त फ्री करता येणार आहेत. चार व्यवहारानंतर सर्व ट्रँजॅक्शनसाठी चार्जेस भरावे लागू शकतात. ट्रँजॅक्शन करणाऱ्यांना २५ रूपये प्रत्‍येक ट्रँजॅक्शनसाठी (Transaction) द्यावे लागू शकतात. (Withdrawing money from ATMs is expensive, learn new rules)

ट्रँजॅक्शन नियमांमध्ये काय बदल

पोस्‍ट ऑफिसने बेसिक सेव्हिंग अकाउंटचे नियम पहिल्‍यासारखेच ठेवत, कॅश डिपॉझिट फ्री ठेवलं आहे. या खात्‍याखेरीज दुसऱ्या कोणत्‍याही सेव्हिंग किंवा चालू खात्‍यातून २५ हजार रूपयापर्यंतची रक्‍कम काढणे फ्री आहे. यानंतर पैसे काढायचे असतील तर, चार्जेस भरावे लागतील. तुम्ही फक्त रोख रक्कम जमा केली नाही तरीही शुल्क आकारले जाईल. बेसीक सेव्हिंग अकाउंट शिवाय इतर कोणत्‍याही सेव्हिंग किंवा करंट अकाउंट मध्ये दहा हजारापेक्षा अधिक रक्‍कम जमा केल्‍यावर प्रत्‍येक वेळी २५ रूपयांपर्यंत शुल्‍क लागू शकते.

जिल्हा हादरला… ! 59 वर्षीय महिलेची हत्या , एकाला अटक

Related Posts
1 of 1,603

तीन खासगी बँकांच्या व्यवहारांचे नियम बदलण्याचा निर्णय

तीन खासगी बँकांनीही व्यवहारांचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ICICI बँकेच्या नवीन नियमांनुसार, पहिले पाच व्यवहार विनामूल्य असतील, तर त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपये शुल्क आकारले जाईल. प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 21 रुपये शुल्क असेल, तर गैर-आर्थिक व्यवहारासाठी हे शुल्क प्रत्येक वेळी 8 रुपये 50 पैसे असेल. (Withdrawing money from ATMs is expensive, learn new rules)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: