26 नोव्हेंबरपर्यंत कृषि कायदे मागे घ्या,अन्यथा… राकेश टिकैत यांचा इशारा

0 133

नवी दिल्ली –   मागच्या एक वर्षांपासून देशाची राजधानी दिल्ली च्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी काद्यांविरोधात (Three agricultural laws) शेतकरी आंदोलन कर आहे. मात्र अद्याप या प्रकरणावर कोणताही निर्णय झालेला नाही. याच दरम्यान आता भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केंद्र सरकारला हे वादग्रस्त कृषि कायदे रद्द २६ नोव्हेंबरपर्यंत रद्द न केल्यास शेतकरी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा दिला आहे. (Withdraw agricultural laws by November 26, otherwise Rakesh Tikait’s warning)

राकेश टिकैत यांनी हा इशारा आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि केंद्र सरकारकडे २६ नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत त्यांनी कृषि कायद्यांसदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा २७ नोव्हेंबरपासून शेतकरी गावागावांतून ट्रॅक्टरने दिल्लीच्या सीमेवर तसेच आसपासच्या आंदोलनस्थळी पोहोचतील आणि भक्कम तटबंदी करतील.

चक्क 124 गाढवांची चोरी, गुन्हा दाखल , किंमत ऐकूण पोलीसही चक्रावले

Related Posts
1 of 1,512

 दरम्यान काल रविवारी  प्रशासन जेसीबीच्या सहाय्याने दिल्लीच्या सीमेवरील तंबू हटवण्याचा प्रयत्न करत होते या घटनेवर  राकेश टिकैत यांनी संताप व्यक्त केला होता. प्रशासन जेसीबीच्या सहाय्याने येथील तंबू हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची आम्हाला माहिती मिळाले आहे. जर त्यांनी तसे केले तर शेतकरी पोलीस स्टेशन, डीएम कार्यालयात तंबू लावतील. दिल्लीच्या गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरून बॅरीकेड्स हटवण्याबाबत आणि मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याबद्दल शेतकरी नेते आणि पोलीस प्रशासनातील वादाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत यांनी हा इशारा दिला आहे.  (Withdraw agricultural laws by November 26, otherwise Rakesh Tikait’s warning)

हे पण पहा – नाशिकच्या ‘ या ‘ भागात बिबट्याचा मुक्त संचार ( पहा व्हिडीओ )

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: