राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप लावत , शर्लिन चोप्राने दाखल केला FIR

0 236

नवी मुंबई –  बॉलिवूड (Bollywood) ची चर्चित अभिनेत्री असणारी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चा पती व्यवसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) हे मागच्या काही दिवसांपासून चर्चा विषय बनला आहे. अश्लील चित्रपट (pornographic films) बनवल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आहे.  तरी देखील त्याच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ने त्याच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप लावून अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. (With serious allegations against Raj Kundra and Shilpa Shetty, Sherlyn Chopra filed an FIR)

अभिनेत्री शर्लिन ने राज आणि शिल्पावर फसवणूक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. शर्लिन चोप्राला राज कुंद्रा प्रकरणादरम्यान अनेक आरोपांना सामोरे जावे लागले होते. तिलाही चौकशीसाठी बोलावले गेले होते. ज्याबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितले आहे.शर्लिन चोप्रा हिने 14 ऑक्टोबर रोजी राज आणि शिल्पाविरोधात एफआयआर दाखल केला होता. तिने याबाबत मीडियाशी संवाद साधला आहे. ती म्हणाले की, मी राज कुंद्राविरोधात लैंगिक छळ, फसवणूक आणि धमकी दिल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.

पत्रकार परिषदेत शर्लिन चोप्रा म्हणाली की, ‘त्यांनी मला अंडरवर्ल्डची धमकी दिली होती. तुम्ही हे नीट लक्षात ठेवले पाहिजे की, तुम्ही माझा लैंगिक छळ केला आहे, तुम्ही मुलींना त्यांचे शरीर दाखवण्याचे पैसे का देत नाही? तुम्ही त्यांना फसवता. तो कलाकाराच्या घरी जातो आणि त्याला अंडरवर्ल्डची धमकी देतो. तो म्हणतोय लैंगिक अत्याचाराची तक्रार मागे घ्या, अन्यथा तुमचे आयुष्य उध्वस्त होईल.’

Related Posts
1 of 85

 हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

पुढे शर्लिन चोप्रा ने सांगितले की, 14 एप्रिल 2021 रोजी तिने जुहू पोलीस स्टेशनला राज कुंद्राविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. 19 एप्रिल रोजी राजने जबरदस्तीने माझ्या घरात प्रवेश केला आणि मला केस मागे घेण्याची धमकी दिली. शर्लिन म्हणाली की, त्याने मला अंडरवर्ल्डची धमकी दिली आणि अनेक धमक्या दिल्या. मी एकटी भयभीत महिला आहे. मी एकटीच राहते, मला भीती वाटली. मात्र, आज मी धैर्याने परत आले आहे.(With serious allegations against Raj Kundra and Shilpa Shetty, Sherlyn Chopra filed an FIR)

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 28 जणांकडून अत्याचार , सात आरोपीला अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: