
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
पुणे – मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी गुरुवारी मोठा निर्णय घेत पुणेशहर अध्यक्ष पदावरून नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांची उचलबांगडी केली आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आता त्यांच्याजागी साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
‘माझी हकालपट्टी झालेली नाही. शेवटी पक्षात खांदेपालट होत असतात. माझ्यावरील कारवाईआधी मीच राज ठाकरेंना सांगितलं होतं की, मे नंतर मला शहराध्यक्षपदावर राहायचं नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. सरतेशेवटी पक्षाने निर्णय घेतला आहे. मी राजसाहेबांचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. राजसाहेबांनी घेतलेला निर्णय मान्य आहे. त्यांच्यासोबत गेली २७ वर्ष मी काम करतोय. साहेब माझ्या हृदयात असतील. सध्यातरी मनसे सोडण्याचा माझा विचार नाही’ असं वसंत मोरे यांनी कालच स्पष्ट केलं आहे.