पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद होणार?, नितीन गडकरी म्हणाले…

0 696

नवी मुंबई – संपूर्ण जगात सध्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या गाड्यांमधून होणारं प्रदूषण (Pollution) पाहता या गाड्यांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक (electric car) गाड्याकडे पहिले जात आहे. भारत सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. त्याचबरोबर जुनी वाहनं आणि पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासठी सरकारने नवीन नियम आणि कायदे अस्तित्वात आणले आहेत.  (Will trains running on petrol-diesel be stopped ?, said Nitin Gadkari)

तसेच इथेनॉलला इंधन म्हणून पर्याय आणण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद होतील, अशी चर्चा आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांसह पर्यायी इंधनांनाही प्रोत्साहन देत आहे, परंतु पारंपरिक इंजिन असलेल्या वाहनांची नोंदणी थांबणार नाही. असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितलं आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या उद्योग संस्थेच्या कार्यक्रमाला वर्चुअली संबोधित करताना त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं.

सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब करण्याच्या बाजूने आहे. याशिवाय इथेनॉल, बायो-एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापरही सरकारला वाढवायचा आहे. असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ज्वलनशील इंधनावर चालणाऱ्या वाहनांची नोंदणी थांबवणार नाही. मला वाटते की आम्हाला काहीही अनिवार्य करण्याची गरज नाही. असंही ते पुढे म्हणाले.

महाविद्यालयात ‘सेक्स रॅकेट’….. , शिक्षकावर गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,487

लोक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत ​​असून या वाहनांची विक्रीही वाढली आहे. सुमारे २५० स्टार्टअप ई-वाहनांच्या विकासामध्ये गुंतले आहेत आणि भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील. असंही ते पुढे म्हणाले. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असल्याचे सांगून ते म्हणाले की, मी स्वतः पुढील महिन्यात हायड्रोजनवर चालणारी कार खरेदी करणार आहे. विमानात वापरल्या जाणार्‍या इंधनात ५० टक्के इथेनॉल वापरण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. (Will trains running on petrol-diesel be stopped ?, said Nitin Gadkari)

हे पण पहा – बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: