
विशेष म्हणजे दोन दिवसांपासून राज्याच्या पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही सध्याच्या या परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या सगळ्या घडामोडी पाहता पोलीस कामालाही लागले आहेत. राज्यात 3 मे नंतर भोंगे लावण्यासाठी पोलिसांची परवानगी लागणार आहे.
परवानगी घेतली नाही तर पोलीस कारवाई करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भूमिकेवर जयंत पाटील यांनी टीका केली आहे.
“राज ठाकरे आता अयोध्येला चालले आहेत. ते तिथे जातील. पण ते तिथे नेमके कशासाठी जात आहेत ते माहिती नाही. दर्शनासाठी जात आहेत की भोंगे वाजवायला जात आहेत, याबाबत त्यांचा कार्यक्रम काय ते मला माहिती नाही.पण राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाच्या हातातील बाहुलं बनून काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांची सर्व सुसज्य व्यवस्था तेथील योगी सरकारने केलेली दिसत आहे”, अशी टीका जयंत पाटलांनी केली. “