DNA मराठी

मनसे – भाजप युती होणार का ? चंद्रकांत पाटील, म्हणाले प्रस्ताव आल्यावर..

0 168
Will there be MNS-BJP alliance? Chandrakant Patil, said when the proposal came ..
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
पुणे –  मागच्या काही महिन्यापासून भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या दोन्ही पक्षात मुंबई महानगर पालिका (BMC) निवडणुकीसाठी युती होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाढव्या मेळाव्यात हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतल्याने या चर्चांनी जोर धरला आहे. तर महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी मनसेला भाजपची बी टीम असल्याचं म्हटलं. या चर्चेवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.  (Will there be MNS-BJP alliance? Chandrakant Patil, said when the proposal came ..)
Related Posts
1 of 2,482
 राज ठाकरे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. ते कोणाची बी टीम म्हणून काम करत नाहीत. त्यामुळे त्यांना जी मतं मांडायची आहेत. त्यांनी ती त्या-त्या वेळेला मांडली आहेत. अनेकदा मोदींच्या विरोधातही मांडली आहेत. महाविकास आघाडी आणि पवार साहेबांचं असं आहे, त्यांना बरं म्हटलं तरच बरं, कोर्टाने त्यांना न्याय दिला तर न्याय आणि कोर्टाने किरीट सोमय्या यांना न्याय दिला की काहीतरी गडबड हे काही बरोबर नाही. राज साहेब ठाकरे हे त्यांची मतं अतिशय परखडपणे मांडत असतात”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
तर युतीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की मनसेला भाजपसोबत घेण्याचा असा कुठलाही प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यावर विचार करण्यासाठी भाजपाची १३ जणांची कोर कमिटी आहे. ते देखील यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही. फार फार तर केंद्राकडे प्रपोजल पाठवू शकतात. त्यामुळे आता अशी कुठलीही शक्यता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ((Will there be MNS-BJP alliance? Chandrakant Patil, said when the proposal came ..)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: