कोकणात होणार मोठा उलटफेर,नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?

0 157

सिंधुदुर्ग –  भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्री पदाची जवाबदारी दिल्यानंतर आता  कोकणातील राजकारणामध्ये  वेगवान घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे.नारायण राणे यांनी विधानसभे ज्या मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं, त्याच कुडाळ मालवण मतदारसंघात आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane)  हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

निलेश राणे हे भरघोस मतांनी निवडून येऊन कुडाळ मालवणचे आमदार होऊदे असं साकडं सिंधुदुर्ग राजाला घालण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी निलेश राणे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच हे साकडे घालण्यात आल्याने, आता निलेश राणे आगामी लोकसभेऐवजी, विधानसभेचीच निवडणूक लढवण्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे हे निवडणूक लढवतील हे या निमित्ताने बोललं जात आहे.

कुडाळ मालवण विधानसभा

कुडाळ मालवण विधासभेत सध्या शिवसेनेचे वैभव नाईक हे नेतृत्त्व करतात. वैभव नाईक यांनी 2014 मध्ये दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व आहे. कोकणातल्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्गचं एक वेगळ स्थान राहीलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांचा समावेश आहे. 2014 मध्ये यापैकी 2 जागा शिवसेनेकडे तर एक काँग्रेसने जिंकली होती. तर 2019 मध्ये भाजपच्या नितेश राणेंनी एक आणि शिवसेनेने दोन जागी विजय कायम राखला.

बिल्डरच्या फार्महाऊसवर जुगाराचा अड्डा, पोलिसांची कारवाई अन् 11 जण ताब्यात

Related Posts
1 of 1,635

2014 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

2014 ला कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक ( Vaibhav Naik) नारायण राणेंचा पराभव करत 10,500 मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. शिवसेनेच्या वैभव नाईक यांना 71 हजार, काँग्रेसच्या नारायण राणे यांना 60,500, तर भाजपच्या बाब मोंडकर यांना 4500 आणि राष्ट्रवादीच्या पुष्पसेन सावंत यांना 2500 मते पडली होती. नारायण राणेंचा अनपेक्षित पराभव करून वैभव नाईक हे राज्यात जाएन्ट किलर म्हणून गणले जाऊ लागले.

हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: