श्रीगोंदयात पकडलेल्या गुटख्याची जाळे मुळे उघडी पडणार का ? अनेक चर्चांना उधाण

श्रीगोंदा :- श्रीगोंदा (Shrigonda) लिंपणगाव रोडवरील हॉटेल अनन्या येथे पोलिसांनी पकडलेल्या गुटक्या बाबत विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले असून या सर्व चर्चा थांबविण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या गुटख्याची जाळे मुळे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांमधून होताना दिसत आहे.
श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा लिंपणगाव रोडवरील हॉटेल अनन्या परिसरात पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून छापा मारला गुन्हा दाखल करून एक जनाला अटक केली मात्र त्यानंतर एकच चर्चेला उधाण आले असून यामध्ये पोलिसांनीच गुटखा चोरला,गुटख्याच्या धंद्यात पोलिसच पार्टनर ,पकडलेला आरोपी खरा आरोपी नाहीच ,कर्नाटक येथून आलेल्या गुटख्यामध्ये वाटाघाटी मध्ये व्यवहार जुळला नाही म्हणून मिळाली पोलिसांना खबर ,यातील बडे मासे तालुक्यातील आर्थिक राजधानीचे शहरात झेंडा चौकातील व्यापारी प्रसिद्ध त्याचे पोलिसांसोबत सलोख्याचे संबंध आहेत.
तसेच शहरातील अनेक व्यापारी पारगाव रोडवरील प्रसिद्ध गुटखा व्यापारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी पोलीस ठाण्याच्या पाठीमागे मुतारीच्या सुगंधात चर्चा करत असल्याचे अनेकांनी पाहिले आहेत. याच ठिकाणी एका पोलीस कर्मचाऱ्यांचे अनेक व्यवहार झाल्याची खमंग चर्चा आहे मात्र पोलिसांचे गुटखा व्यावसायिक यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याच्या मथळ्याखाली वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध होताना अनेक पोलीस कर्मचारी यांचे चेहरे पडलेले दिसले तर काहींचे फुललेले दिसले.
त्यामुळे हा सर्व प्रकार पोलिसांना थांबवायचा असेल तर त्यांनी तालुक्यातील गुटख्याची मुरलेली जाळे मुळे उपटून गुटखा प्रकरणातील खरे आरोपी यांच्यावर कारवाई करावी नाहीतर नेहमीप्रमाणे छोटे मासे पकडले जाऊन कारवाईचे धनी होतात मात्र मोठे मासे कायम सुरवंटराव यांच्यासारखी भूमिका घेत सर्व काही पचन करतात असे आतापर्यंत घडत आले आहे . त्यामुळे या सर्व चर्चा थांबविण्यासाठी मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागतील का हे चित्र काही दिवसातच स्पस्ट होईल असेही तालुक्यातील काही नागरिकांचे मत आहे.
बातम्या थांबविण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचा अफवा
गुटख्याच्या बातमी प्रसिद्ध होऊन पोलीस कामाला लागले तर गुटख्याचे मोठे मासे पकडले जाण्याची भीती वाटू लागल्याने गुटखा व्यापारी शहरात लवकरच गुन्हे दाखल करणार असल्याची अफवा पसरवली आहे. मात्र याचा माध्यमावर कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही
ग्रामीण भागासह शहरात वितरणासाठी वेगळी माणसे
कर्नाटक येथून ट्रकच्या साह्याने गुटखा श्रीगोंदा तालुक्यात आणला जातो त्याचे तेथून वाटप करण्यात येते मग दुचाकीच्या साह्याने तो माल प्रत्येक पान टपरी वर पोहचवला जातो यात अनेकांचे आशीर्वाद लाभले जातात म्हणूनच हे वितरण अगदी मनमोकळ्या पणाने होते.
आशिर्वाद प्रदान करणारे कोण ?
गुटखा व्यवसाय बंदी असल्यामुळे सर्व सामान्य माणूस याच्या नादीच लागत नाही यासाठी आशीर्वादकरिते सुरवातीला पोलीस ,राजकीय नेत्यांच्या वारस,नगरसेवकांचा नातेवाईक अश्या अनेक पडद्याआड लोकांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय तेजीत चालू असल्याचे बोलले जात आहे.
चेरी मेरी व्यवसायिक ताबडतोब पोलीस कारवाईचा बळी
गुटखा व्यवसायात नव्याने कोणी पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला तरीही सर्व जुने व्यवसायिक पोलिसांना हाताशी धरून त्याच्यावर कारवाई चा बडगा उगारायला लावतात त्यामुळे व्यावसायिक यामध्ये तात्काळ व्यवसाय बंद करतो अश्या अनेक घटना सर्वश्रुत आहेत.