
श्रीगोंदा – नगराध्यक्ष शुभांगी मनोहर पोटे ( Shubhangi Pote) व कॉंग्रेसचे गटनेते यांना अपात्र ठरवावे यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस व सतीश बोरुडे यांनी मा. राज्यमंत्री नगर विकास यांचेकडे जिल्हाधिकारी यांनी फेटाळण्याविरुद्ध अपील दाखल केले होते. या विशायांकित प्रकारना बाबतच सुनावणी दि. २६ एप्रिल २०२२ रोजी राज्यमंत्री नगरविकास यांचे दालनात दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
याबाबत अर्जदार टिळक भोस बोलताना म्हणाले की, पोटे दाम्पत्य नगरपालिकेत कॉंग्रेसच्या पंजा चिन्हावर निवडून आले आहे. त्यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करत बबनराव पाचपुते यांचा प्रचार केला.
त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कॉंग्रेस पक्षाचे काम सुरु केले आहे. वारंवार पक्ष बदलण्याच्या कृतीमुळे पोटे दाम्पत्यास महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अन्हर्ता अधिनियम १९८६ च्या कलम (३) (१) (अ) प्रमाणे अपात्र ठरवावे आणि अहर्तेच्या तारखेपासून सहा वर्षापर्यंत त्यांना अध्यक्ष तसेच नगरसेवक राहण्यास व होण्यास अपात्र ठरवावे असा अर्ज टिळक भोस, सतीश बोरुडे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केलेला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे ७ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकारी यांनी अपात्रतेबाबतचा अर्ज फेटाळला होता. म्हणून राज्यमंत्री नगर विकास यांचेकडे ९ नोव्हेंबर २०२० रोजी अपील दाखल करण्यात आले होते. मात्र आजतागायत पर्यंत नगरविकास मंत्री त्या प्रकरणावर सुनावणी घेण्यास टाळाटाळ करत होते, यावर भोस यांनी अनेक वेळा पत्र व्यवहार केला होता तसेच नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांना विनंती केली होती मात्र जाणीव पूर्वक टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास येत होते अखेर तनपुरे यांच्या राहुरी येतील निवासस्थान समोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने व तनपुरे यांच्या कार्यलयाने दिनांक-26 एप्रिल 2022 रोजी मंत्रालयात सुनावणी घेत असल्याचे पत्र भोस-बोरुडे यांना पाठवले
सतीश बोरुडे यांवर मारेकरी पाठवून पोटे यांनी हल्ला घडवला त्याविरुद्ध श्रीगोंदा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. तसेच आक्रोश मोर्चा मध्ये मनोहर पोटे यांवर भोस यांनी कडक शब्दांत जहरी टीका केल्याने या प्रकरणाकडे संम्पूर्ण श्रीगोंदा शहराचे लक्ष लागले आहे. पोटे यांच्यावर कारवाई होऊन ते अपात्र होतात की त्यांना अभय मिळतो हे लवकरच सिद्ध होईल..!
न.प.सार्वत्रिक निवडणूक पंजा चिन्हावर लढून पोटे पती-पत्नी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप मध्ये प्रवेश केल्याचे सर्व पुरावे आहेत.तसेच पुन्हा महा विकास आघाडी स्थापन झाल्यावर पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे त्यांनी ते पक्षांतर बंदी कायदा नुसार अपात्र होणारच.!