BCCI मधून Out होणार जय शाह ? तर गांगुली … , वाचा सविस्तर माहिती

0 192
Will Jai Shah be out of BCCI? So Ganguly ..., read the details
 मुंबई  –  विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय कसोटी संघचा अचानकपणे कर्णधारपद सोडल्यानंतर पुन्हा एकदा बीसीसीआय (BCCI) चर्चेत आले आहे. याच दरम्यान आता बीसीसीआयबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) बीसीसीआय सेक्रेटरी जय शाह (Jay Shah) ऑक्टोबर 2022 नंतर आपआपल्या पदावरून पायउतार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  (Will Jai Shah be out of BCCI? So Ganguly …, read the details)
ऑक्टोबर2022मध्ये दोघांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा स्थितीत या दोघांच्या जागी नवीन अध्यक्ष आणि सचिव नेमले जाणार की पुन्हा गांगुली-शहा यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. मागच्या तीन महिन्यात विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडल्याने .या पाठीमागे सौरव गांगुली आणि जय शाह असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
बीसीसीआयच्या नवीन संविधानानुसार, स्टेट क्रिकेट अथॉरिटी किंवा बीसीसीआयमध्ये सहा वर्षांच्या कार्यकाळानंतर तीन वर्षांच्या कूलिंग-ऑफ पिरियडवर बंधनकारक आहे. गांगुली आणि शाह यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये पदभार स्वीकारला. त्यापूर्वी गांगुली पश्चिम बंगालमध्ये तर जय शाह दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत होते. बीसीसीआयमध्ये नियुक्ती झाली तेव्हा स्टेट आणि नॅशनल युनिटमधील त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास फक्त नऊ महिने शिल्लक होते.त्यामुळे याबाबत हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ‘एजीएममध्ये 9 ऑगस्ट 2018 पासून लागू होणाऱ्या कुलिंग ऑफ पिरियडच्या नियमांत सुधारणा करून पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवण्यास मान्यता दिली .  या निर्णयाचा आधार घेऊन ही याचिका दाखल करण्यात आली होती. (Will Jai Shah be out of BCCI? So Ganguly …, read the details)
Related Posts
1 of 2,107
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: