पठारी भागात पाणी आणण्यासाठी जगन्नाथ भोर यांना मदत करणार…

0 166
Will help Jagannath Bhor to bring water to the plateau area ...

 

अहमदनगर : नगर व पारनेर भागातील पठार भागात शेतीसाठी पाणी आणण्यासाठी जगन्नाथ भोर (Jagannath Bhor) प्रयत्न करित आहेत. त्यासाठी पिंपळगाव कौडाचे ग्रामस्थ सर्वप्रकारची मदत व सहकार्य करणार असल्याचे सरपंच सतीश प्रकाश ढवळे यांनी केले.

पिंपळगाव कौडा येथे आज ग्रामस्थांबरोबर भोर यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी श्री सहादू पवार, बन्सी कोल्हे, भरत, आण्णा गवळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Posts
1 of 2,357

जगन्नाथ भोर म्हणाले की, साकाळाई उपसा जलसिंचन योजना लवकरच मार्गी लागणार आहे. शहाजापूर उपसा जलसिंचन योजना सुद्धा मार्गी लागणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

ही योजना झाल्यास आपल्या भागातील टॅकर, जनावरांच्या छावण्या कायमच्या हद्दपार होतील. या भागाचे नंदनवन होईल अशी अपेक्षा ग्रामस्थानी व्यक्त केली. त्यामुळे ग्रामस्थांनी यासाठी लवकरच कृती समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: