श्रीगोंद्यात गुटख्याला राजकीय झालर ? अनेक चर्चांना उधाण

1 185
Will Gutkha become political in Shrigonda? Many discussions abound
 
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा व्यवसाय आगदी जोमाने सुरू आहेत त्याचे मुख्य कारण म्हणजे तालुक्यातील अवैध गुटखा व्यवसायाला खाकी आम्ही व्हाईट कॉलर यांची सांगत असल्यामुळे श्रीगोंदयात गुटखा व्यवसाय अगदी जोमाने सुरू आहेत असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

 

श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या गुटखा चोऱ्या त्यातून झालेल्या पोलीस कारवाया त्यात कायम पडद्याआड राहून आपला हेतू साध्य करणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे बिनदास्त अधिकारी यांच्या आशीर्वादाने श्रीगोंदा शहरात गुटख्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची दरमहा उलाढाल होते यात काही अधिकारी तसेच राजकीय पदाधिकारी यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचे निदर्शनास येत आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.  मात्र श्रीगोंद्यात गुटखा व्यवसायिकांच्या मदतीला राजकीय झालर येत असल्यामुळे श्रीगोंदयात मोठ्या प्रमाणात गुटखा व्यवसाय फोफावला गेला आहे.  त्यात मोठ्या प्रमाणात अन्न आणि औषध प्रशासन यांना लागलेली निगरगट्ट झोप अगदी गुटख्यावाल्याचा फायद्याची ठरत आहेत.  त्यामुळे गुटख्यावाले जोमात तर अण्णा आणि औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासण कोमात असल्याचे चित्र श्रीगोंदा तालुक्यात पाहण्यास मिळत आहे त्यामुळे यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

तरुणाईच्या गुटख्याच्या माध्यमातून जीवाशी खेळ ?
Related Posts
1 of 2,459
श्रीगोंदा तालुक्यातील अनेक किशोरवयीन मुले गुटख्याच्या आहारी गेले आहेत त्यातून त्यांना गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे राजकीय वलय देऊन लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतून होताना दिसत आहे.
अन्न आणि औषध प्रशासन फक्त नावाला?
गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात गुटखा व्यवसाईक तसेच ठोक विक्रेते यांच्यावर न भूतो न भविष्य आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने श्रीगोंदा तालुक्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन फक्त नावालाच उरले आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
Show Comments (1)
error: Content is protected !!
%d bloggers like this: