लवकरच फेसबुक चा बदलणार नाव ? , जाणून घ्या कारण … चर्चांना उधाण

0 119
नवी मुंबई –  संपूर्ण जगात लोकप्रिय असलेल्या फेसबुक (Facebook) लवकरच आपल्या नावात बद्दल होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. फेसबुक कंपनी नावात बद्दल करण्याचा विचार करत आहे. रिब्रॅण्डींग (Rebranding) च्या उद्देशाने हा बदल करण्याचा विचार सुरु असून पुढील आठवड्यामध्ये यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलण्याचा विचार सुरु आहे. (Will Facebook change its name soon? , Know because … discussions abound)
फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) या विषयावर कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलणार असल्याची माहिती समोर येत आहे. २८ ऑक्टोबर रोजी ही बैठक होणार आहे. मात्र त्याआधीच यासंदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.मे टाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचा ही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं.
 हे पण पहा  – Eid E Milad un Nabi Ahmednagar 2021
Related Posts
1 of 1,603

या रिब्रॅण्डींगच्या माध्यमातून कंपनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणखीन एका मोठ्या श्रेत्रामध्ये पूर्णपणे वेगळी सेवा निर्माण करु पाहत आहे. आधीच या कंपनीच्या उप कंपन्यांमध्ये इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस आणि इतर कंपन्या आहेत. मात्र सध्या सुरु असणाऱ्या या नाव बदलासंदर्भातील चर्चांवर आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं फेसबुकने म्हटलं आहे.(Will Facebook change its name soon? , Know because … discussions abound)

पेट्रोलच्या दरात सलग दहाव्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचा आपल्या शहरातील दर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: