सुवर्ण पदक जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार…

श्रीगोंदा – खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत वेटलिप्टींग मध्ये सुवर्ण पदक मिळेल या ध्येयाने मैदानात उतरलो मात्र कांस्य पदकावर समाधान मानावे लागले अग्नीपंख फौंडेशनने दिलेले प्रोत्साहन पुढील स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्यासाठी बळ देईल असा विश्वास वेटलिप्टर गणेश बायकर याने व्यक्त केला.
अग्नीपंख फौंडेशनने गणेश बायकर( क्रीडा) लैला काळे (पी एस आय दयानंद वाखारे केंद्रीय अधिकारी विजय त्रिंबके (सी ए) डॉ अनील शिंदे सारिका ननवरे रामदास ननवरे प्रतिभा गांधी (रुग्णसेवा) सुरेश झेंडे (बससेवा) यांचा सन्मान पोलिस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव पोलिस निरीक्षक रामराव ढिकले वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर यांचे हस्ते करण्यात आला यावेळी गणेश बायकर बोलत होता.
लैला काळे म्हणाल्या कि मी पारधी समाजातील लग्नानंतर बी ए केले पतीने साथ केली त्यामुळे एम पी एस सी ची परिक्षा दिली आणि पी एस आय होण्याचे स्वप्न साकार झाले.
पोलिस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव म्हणाले की संघर्षातून मात करुन यशाचे शिखर सर विद्यार्थी आणि सामाजिक जाणीवेतून काम करणाऱ्या व्यक्तींना अग्नीपंख फौंडेशन हे प्रोत्साहन देत आहे त्यामुळे भविष्यात निश्चित चांगले मोहरे पुढे येतील.
यावेळी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर यांनीही मनोगत व्यक्त केले .यावेळी अॅड निवृत्ती वाखारे दिंगाबर बायकर चंदन घोडके दादा सोनवणे उपस्थित होते. आभार अमोल गव्हाणे यांनी मानले.