Cryptocurrency वर बंदी येणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

0 108

नवी दिल्ली –   मोदी सरकार (Modi government) या हिवाळी अधिवेशनात (Winter Session 2021) क्रिप्टोकरन्सी अॅण्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021 (Cryptocurrency and Regulation of Official Digital Currency Bill 2021) सादर करू शकते अशी माहिती समोर आली आहे.  या हिवाळी अधिवेशनात सरकार 26 विधेयके मांडणार आहे. डिजिटल चलन विधेयक 2021 च्या मदतीने भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत डिजिटल चलन जारी करण्यासाठी एक सोयीस्कर फ्रेमवर्क मिळेल. याशिवाय हे विधेयक भारतात खाजगी क्रिप्टोकरन्सींवरही बंदी (Cryptocurrency Ban) घालणार आहे. (Will cryptocurrency be banned? Modi government likely to take a big decision)

हे विधेयक या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने काही अपवादांनाही परवानगी देईल. क्रिप्टोकरन्सीसंदर्भात संसदीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. भारताने क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्याची आणि त्याची दिशा ठरवण्याची वेळ आली आहे, असे त्या बैठकीत मान्य करण्यात आले.

निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती, पराभवानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

क्रिप्टोकरन्सीवर पंतप्रधान मोदींची नजर

Related Posts
1 of 1,486

सध्या, क्रिप्टोकरन्सीवर कोणतेही नियमन किंवा बंदी नाही. गेल्या आठवड्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी क्रिप्टोकरन्सीच्या संभाव्यतेबाबत वरिष्ठ अधि काऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली होती. त्याआधी, जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या वित्तविषयक स्थायी समितीच्या क्रिप्टो प्रतिनिधींसोबत एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत क्रिप्टोवर बंदी न घालण्यावर एकमत झाले. (Will cryptocurrency be banned? Modi government likely to take a big decision)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: