
प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई – देशासह राज्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patients) संख्या कमी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. यामुळे आता राज्यात लागू असणाऱ्या कोरोना निर्बंध हटवण्याचा विचार सरकारकडून सुरु झाला असून गुडीपाडव्याच्या (Gudi Padwa) दिवशी राज्यातील जनतेला याबद्दल माहिती दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर आपत्ती व्यवस्थापण कायदा राज्यात लागू करण्यात आला होता. पण सध्या कोरोनाचा संसर्ग अल्प प्रमाणात असल्याने लावलेले निर्बंध हटवण्यात येणार आहेत. (Will Corona be freed from restrictions? ; A big decision will be made on the day of Gudipadva)
गुडीपाडव्याच्या दिवशी होणार निर्णय
महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून कोरोना निर्बंधातून मुक्ती होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण गुडीपाडव्याच्या दिवशीचं सगळ्यांना ही खूशखबर मिळणार आहे. दोन वर्षापासून मास्क वापरत असलेल्या जनतेची मास्कपासून सुटका होणार आहे. महाराष्ट्रात कोरोना साथीच्या दरम्यान राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेवर असलेले सगळे निर्बंध देखील हटणार आहेत.
पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात चिंता
चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चीन मध्ये सध्या पाच कोटी लोकांना लॉक करण्यात आले आहे. चीन च्या पाच मोठे शहरात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. चीनमध्ये अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. भारतात केंद्र सरकारने कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथील केले आहेत. पण, केंद्राने राज्यांना महत्त्वाच्या सूचना देखील केल्या आहेत. (Will Corona be freed from restrictions? ; A big decision will be made on the day of Gudipadva)