भाजपा – मनसे एकत्र येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले ……

0

नागपूर – राज्यात येणाऱ्या आगामी काळात मुंबई महानगर पालिकाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष स्वयंबळावर  लढवणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे तर दुसरीकडे या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोघेपक्ष एकत्र येऊन निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांनी होत आहे. मात्र यावर दोन्ही पक्षाने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. (Will BJP-MNS come together? Devendra Fadnavis said ……)

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीहून नागपूरला आले आहेत. नागपूर विमानतळावर येताच माध्यमांनी त्यांना घेराव घातला. यावेळी मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा प्रश्न  पत्रकारांनी विचारला असता त्यावर मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा सवाल करण्यात आल्यावर योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपा आणि मनसे एकत्र येणार का? या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

एसएससीने जाहीर केली जीडी कॉन्स्टेबलची बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Related Posts
1 of 1,184

मनसेने परप्रांतीयांबाबतचा मुद्दा सोडला तर त्यांच्याशी युती होऊ शकते, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारले असता, मनसेसोबत युती करण्याचा निर्णय योग्यवेळी होईल. अजून त्याला वेळ आहे, असं ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंही त्यांनी म्हटलं.

तर दुसरीकडे सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) ही सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेत्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहातच आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते भेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्यास त्यांच्यात युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्यासोबत चंद्रकांत पाटील हे नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबई महापालिकेच्या युतीबाबत चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची पहिल्यांदाच ही भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीतून राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.(Will BJP-MNS come together? Devendra Fadnavis said ……)

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना जोर 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: