अजित पवार देणार भाजपाला मोठा धक्का? केला “हा” महत्त्वपूर्ण विधान

0 4,851

पुणे –  लवकरच पुणे (Pune Municipal Corporation ) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिके(Pimpri Chinchwad Municipal Corporation elections) च्या निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली आहे. अजित पवार लवकरच भारतीय जनता पक्षाबरोबर मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारी आहे. पुण्यातले काही भाजप नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी अजित पवार भाजपला धक्का देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.(Will Ajit Pawar give a big push to BJP? Made the “this” important statement)

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्त्वाखाली लढली जाणार आहे. पुण्यातील भाजपचे काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. पण मी खालच्या पातळीवरचं राजकारण करत नाही. भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी दिलेली आहे. पालिका हाती असल्यास चांगलं काम करता येतं, असं अजित पवार म्हणाले.

डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून रोख रकमेची लुटमार करणारे आरोपी जेरबंद

Related Posts
1 of 1,654

विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवूनच आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक वर्षे काम केलं. पण २०१३-१४ मध्ये देशात नरेंद्र मोदींची हवा होती. त्यामुळेच चांगलं काम करूनही आम्हाला पराभव पत्करावा लागला. मात्र आता भाजपचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. ज्यांना यायचं आहे, त्यांनी अपात्र ठरता कामा नये, असं मी त्यांना सांगितलं आहे. कारण अपात्र ठरल्यावर ६ वर्षे निवडणूक लढवता येत नाही. आत्ता जे पक्षात आले आहेत, ते अपक्ष आहेत. असेही काही जण संपर्कात आहेत, ज्यांचे पती नगरसेवक आहेत किंवा पत्नी नगरसेविका आहे तर तिचे पती पक्षाच्या संपर्कात आहेत, असा दावा पवारांनी केला.(Will Ajit Pawar give a big push to BJP? Made the “this” important statement)

हे पण पहा – भाजपा मधील अनेक जण महाविकासआघाडी मध्ये येण्यास तयार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: