आपल्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने केला सुपारी देऊन खून

0 345

 औरंगाबाद –   अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा एक लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीने हत्या (wife kills husband) केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्हयात घडली आहे. रामचंद्र रमेश जायभाये (Ramchandra Ramesh Jayabhaye) मयत व्यक्तीचा नाव आहे. या प्रकरणात चिकलठाणा पोलिसांनी (Chikalthana police) मृताची पत्नी, तिच्या प्रियकरासह चार संशयितांना अटक केली आहे. मृत रामचंद्र यांचा भाऊ कृष्णा रमेश जायभाये यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Wife kills husband who obstructed her immoral relationship )

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि. २१  ऑक्टोबर रोजी पोलिसांना पिसादेवी परिसरातील नाल्यात एक मृतदेह आढळला होता.  त्याच्या आधारकार्डवर रामचंद्र रमेश जायभाये असे नाव आढळले त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी दोन पथके तयार केली होती . संशयावरुन मृताची पत्नी मनीषा व तिचा प्रियकर गणेश उर्फ समाधान सुपडु फरकाडे याचा शोध घेत ताब्यात घेतले. चौकशीत मनीषा आणि  गणेश यांनी हत्येसाठी, राहुल आसाराम सावंत (रा. सातारा परिसर) व निकितेश अंकुश मगरे (रा. बालाजीनगर, मोंढा नाका) यांना एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले.

हसन मुश्रीफ यांची जागा कोण घेणार , पाटील की तनपुरे ,कोण होणार पालकमंत्री

Related Posts
1 of 1,486

२० ऑक्टोबरच्या रात्री रामचंद्र जायभाये घरात झोपलेले असताना फरकाडे, मगरे आणि सावंत हे तिघे घरात आले.त्यांना घरात दाखल करण्यासाठी मनीषाने त्यांना मदत केली. सर्वांनी त्यांच्या मानेवर धारदार चाकुने वार केले नंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला अशी कबुली मनीषाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावरुन सावंत व मगरे याचा शोध घेत त्यांना अटक करण्यात आल्याचे चिकलठाणा पोलिसांनी सांगितले . (Wife kills husband who obstructed her immoral relationship )

 हे पण पहा – बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील | खासदार विखेंचा घणाघात

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: