मंत्री आव्हाड यांच्या अटक आणि सुटकेची बातमी गुप्त का राहिली?, वाचा सविस्तर

0 340
नवी मुंबई –   राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे नेते  जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना काल दि. १४ ऑक्टोबर रोजी अनंत करमुसे प्रकरणात अटक करण्यात आली होती.या प्रकरणात त्यांना लगेच दहा हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका ही करण्यात आली होती. मात्र राज्यतील मंत्रीला अटक केल्याची ही बातमी पत्रकारांना माहिती नव्हती.भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्याची माहिती दिली. (Why the news of the arrest and release of Minister Awhad remained secret ?, read in detail)
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली.  या ट्विटनंतर  पत्रकारांची एकच धावपळ सुरू झाली आणि बातमी फुटली.
मिळालेल्या माहितीनुसार  ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्यांना दुपारी 4.30 वाजता कोर्टात हजर करण्यता आलं. मूळ एफआयआरमध्ये त्यांचं नाव नव्हतं. त्यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचे आरोप करण्यात आले होते. कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडून देण्यात आलं.

 

 गोपनीयते मागचं कारण काय?

Related Posts
1 of 1,494

आव्हाड यांच्या अटकेची बातमी इतकी गोपनीय कशी राहिली यावर अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. काहींच्या मते, पत्रकारांना ही बातमी कळली नसली तरी वरिष्ठ नेतृत्वाला मात्र त्याची माहिती असेल. एखाद्या मंत्र्याला अटक करायची म्हटल्यावर चर्चा करून नंतरच निर्णय घेतला असेल. फक्त वरिष्ठ पातळीवरून बातमी लिक होऊ देऊ नये म्हणून काळजी घेतली असेल.  आव्हाड हे मंत्री आहेत. त्यामुळे मीडियात हे प्रकरण गाजू नये म्हणून तिन्ही पक्षातील नेत्यांनी आणि पोलिसांनीही ही बातमी गुप्त ठेवली असावी, असंही काहींचं म्हणणं आहे. 

जुगार अड्यावर छापा , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, इतका मुद्देमाल जप्त

आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनीअर तरुणाने केला केला होता. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता.  याच प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे.(Why the news of the arrest and release of Minister Awhad remained secret ?, read in detail)

 हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: