भाजपमधील नेत्यांच्या गुन्ह्यांबाबत ईडीची कारवाई का नाही ? – नवाब मलिक

0 224
नवी मुंबई –   केंद्र सरकार (Central Government) आपल्या सत्तेचा गैरवापर करुन ईडी (ED) च्या माध्यमातून विरोधी पक्षातील लोकांवर कारवाई करत आहे. मात्र जे लोक भाजप (BJP) मध्ये आहेत त्या लोकांवर ईडीचे गुन्हे दाखल होऊनही कारवाई केली जात नाही. याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)  यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, नेते हे ईडी कार्यालयात जाणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.(Why isn’t ED taking action against BJP leaders? – Nawab Malik)
भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही, ते तपास का थांबवण्यात आले याची माहिती देखील ईडी कार्यालयात जाऊन घेणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच ईडीला सहकार्य मिळण्यासाठी माहिती गोळा झाली आहे.

लाच घेतल्या प्रकरणी आरोग्य निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात

Related Posts
1 of 1,640
ज्यांच्यावर तक्रारी आहेत त्यांच्याबाबतची कारवाई गतीमान करा, असे आवाहनही ईडीच्या अधिकाऱ्यांना करणार असल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले.(Why isn’t ED taking action against BJP leaders? – Nawab Malik)

हे पण पहा – नऊ ते दहा दिवसात चौकशी पूर्ण करून शासनाला अहवाल दिला जाईल – राधाकृष्ण गमे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: