रावणाच्या श्रीलंकेत भारतापेक्षा पेट्रोल स्वस्त का ? सरकारने दिला हा उत्तर 

0 23

  नवी दिल्ली –   १ फेब्रुवारी रोजी देशाच्या संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१ रोजी अर्थसंकल्प मांडला मात्र वाढत्या  इंधनाच्या  दरावर सर्वसामान्य जनतेला कोणताही दिलासा मिळाला नाही.

वाढत्या इंधनाच्या दारावरून भारतीय जनता पक्षावर काँग्रेस बरोबरच इतर दुसऱ्याविरोधी पक्ष सुद्धा टीका करत आहे. याच मुद्द्यावरून संसदेत समाजवादी पक्षाचे खासदार विश्वंभर प्रसाद निषाद माता सीतेच्या नेपाळ आणि रावणाच्या श्रीलंकेत पेट्रोल स्वस्त आहे. तर मग आपलं सरकार प्रभू रामाच्या देशातही पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला असता त्यावर  केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना भारताच्या तुलनेत कमी लोकसंख्या असणाऱ्या देशांसोबत तुलना करणं अयोग्य असल्याचं म्हटलं. या देशांची लोकसंख्या कमी असल्याने इंधनाचा वापरदेखील कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.

 उदयनराजे यांच्या भेटी नंतर नाना पटोले म्हणाले जस्ट वेट अँड वॉच 

आपण आपली तुलना मोठ्या अर्थव्यवस्थेशी करायची की छोट्या? या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या वस्तू महाग आहेत. या देशांमध्ये केरोसिनचा असणारा दर आणि आपल्या देशातील दर यामध्ये खूप तफावत आहे. बांगलादेश आणि नेपाळमध्ये केरोसिनचा दर प्रतीलिटर ५७ ते ५९ रुपये असून आपल्याकडे ३२ रुपये आहे अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली .

Related Posts
1 of 1,301

नाना पटोले यांना फक्त प्रदेशाध्यक्ष पद तर विधानसभा अध्यक्षपदासाठी थोपटेंचं नाव चर्चेत ?

विरोधकांनी इंधनाच्या वाढत्या दराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय किंमतीच्या यंत्रणेने नियंत्रित केले जात असल्याचं सांगितलं गेल्या ३०० दिवसांमध्ये जवळपास ६० वेळा इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. आम्ही सात वेळा पेट्रोल आणि २१ वेळा डिझेलचा दर कमी केला आहे. तर २५० दिवस आम्ही दर वाढवला किंवा कमी केलेला नाही. त्यामुळे हा आरोप चुकीचा आहे असं त्यांनी सांगितलं.

धक्कादायक !महिलेची हत्या करून मृतदेहवर अ‌ॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: