‘नवऱ्याला फोन का करतेस?’ म्हणत पती – पत्नीला मारहाण; गुन्हा दाखल

0 317
Young man beaten to death on suspicion of mobile theft; Death of a young man

 

 

अहमदनगर – महिलेला मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द मारहाण, विनयभंग कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया ऊर्फ सोनम भंडारी व पंकज ऊर्फ अनिकेत भंडारी (रा. समता कॉलनी, विनायकनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली.

 

 

फिर्यादी महिला सोमवारी दुपारी श्रमिक कार्ड बनविण्यासाठी जात असताना जया ऊर्फ सोनम भंडारी त्यांना भेटली व म्हणाली, ‘तु माझ्या नवऱ्याला फोन का करतेस’, असे म्हणून शिवीगाळ केले.

 

 

Related Posts
1 of 2,427

यानंतर फिर्यादी व त्यांचे पती जयाला जाब विचारण्यासाठी गेले असता जयाने फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पंकज हा तेथे आला त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. भांडणात फिर्यादीच्या गळ्यातील पोत गहाळ झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक फौजदार गिरीष केदार करीत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: