भारतीय संघाचा कोच कोण होणार ? सौरव गांगुलीनं दिलं मोठं अपडेट

0 225

 नवी मुंबई –  भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे कोच (coach) रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी – २० वर्ल्डकप (T20 World Cup) नंतर संपणार असून पुढचा भारतीय संघाचा कोच कोण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पुढील कोचसाठी बीसीसीआय (BCCI) ने अर्ज देखील मागवण्यास सुरुवात केली आहे. प्रसारमाध्यमात आलेल्या बातमीनुसार भारताचा पुढील कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) होणार आहे मात्र अद्याप या विषयावर बीसीसीआयनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.(Who will be the coach of Indian team? Big update from Sourav Ganguly)

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी एका कार्यक्रमात या विषयावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. गांगुली म्हणाले  द्रविड टीम इंडियाचा हेड कोच होणार की नाही याबाबत अजून काहीही निश्चित झालेलं नाही. तो कोच होणार असल्याचं मी वृत्तपत्रांमध्ये वाचले. आम्ही कोच पदासाठी  जाहिरात दिली आहे. त्याची इच्छा असेल तर तो त्यासाठी अर्ज करु शकतो.

 हे पण पहा – बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील | खासदार विखेंचा घणाघात

Related Posts
1 of 65

सौरव गांगुली आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांनी राहुल द्रविडचं हेड कोच होण्यासाठी मन वळवलं असल्याचं वृत्त प्रकाशित झालं होतं. टी20 वर्ल्ड कपनंतर लगेच द्रविड टीम इंडियाचा कोच होणार असल्याचं यामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. गांगुलीनं द्रविडशी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बाबत (NCA) दुबईमध्ये चर्चा झाल्याचे सांगितलं. ‘द्रविड सध्या एनसीएचा संचालक आहे. तो दुबईमध्ये या विषयावर चर्चा करण्यासाठी आला होता. नव्या क्रिकेटपटूंच्या जडणघडणीमध्ये एनसीएची भूमिका मोठी असते. द्रविड याच विषयावर चर्चा करण्यासाठी आला होता, असे गांगुलीने स्पष्ट केले.(Who will be the coach of Indian team? Big update from Sourav Ganguly)

धक्कादायक! सैतानाचा अवतार असल्याचे सांगत महिलेला नग्न करून बळी देण्याचा प्रयत्न

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: