गुटखा प्रकरणात तो पोलीस कोण ? तर्क वितर्काना उधाण

श्रीगोंदा :- श्रीगोंदा पोलिसांनी गुटख्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला मात्र नागरिकांतून टीकेची झोड होताच प्रसार माध्यमातून बातम्या झळकल्या वर नागरिकांतून तो पोलीस कोण याबाबत चर्चेला उधाण आले आहे. श्रीगोंदा पोलीस आणि अवैध व्यवसायिक याच्याय सलोख्याचे प्रेम असल्याबाबत अनेक घटना उधडकीस आल्या आहेत त्यातच आता हे गुटखा प्रेम प्रसार माध्यमातून जनतेच्या समोर आल्याचे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
कर्नाटक येथून श्रीगोंदा तालुक्यात गुटखा आल्यानंतर ठराविक पोलिसांना ते नेहमीप्रमाणे माहीत झालेच मग श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या एक पोलिसाने आपल्या मदतीला काही लोक घेऊन गुटखा लुटला तो तालुक्यात रीतसर वाटप करण्यासाठी अजब शक्कल वापरत दोन पीक अप आधीपासूनच तयार होते. त्यामध्ये माल टाकून तो तालुक्यात वितरण होणार होता मात्र वाटाघाटी मध्ये प्रकरण फिस्कटले आणि दुसऱ्या पोलिसांना सुगावा लागून दोन्ही मधील एक मालवाहतूक पीक अप गायब झाले.
प्रकरण अंगाशी येणार हे पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसाने एका खाजगी व्यक्तीला लाखो रुपये देऊन गुन्हा अंगावर घेण्यास सांगितले हा सर्व प्रकार प्रसार माध्यमातून झळकल्या मुळे श्रीगोंदा पोलिसांमध्ये खळबळ उडाली अनेकांचे चेहरे पडले अनेकांचे उजळले मात्र नागरिकांतून बातम्या प्रसिद्ध झाल्यावर कुंपनच शेत खातंय तसेच चोर तो चोर आणि वर शिरजोर अश्या प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियातून आज दिवसभर पाहण्यास मिळाल्या तर काही पोलिसांच्या तोंडून प्रकरण वाढवू काम करताना चुका होतात अश्या तिखट मीठ प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत होत्या मात्र अधिकारी वर्गातून मौन व्रत बाळगताना दिसून येत होते.
कारवाई मधील बाकीचे आरोपी कुठे आहेत ?
गुटखा चोरीच्या प्रकरणात 18 जण खाजगी लोक होते आणि पोलिसही होते मग एकच आरोपी अटक आहे बाकीचे आरोपी नेमके कुठे आहेत असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
पोलिसांचे मित्र कोण ?
गुटखा चोरीत सक्रिय असणाऱ्या पोलीसांचा श्रीगोंदा शहरातील गुटखा विक्रेता मित्र कोण ? तसेच यामध्ये अजून कोणकोणत्या लोकांचा समावेश आहे याचाही शोध पोलिसांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्या पोलिसांचा तडजोड करण्यासाठी जोरदार प्रयत्न
गुटखा प्रकरणात प्रसार माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्यावर आपले प्रकरण समोर येऊन कारवाई होऊ नये यासाठी तो पोलीस राजकीय नेत्यांच्या आश्रय घेत कारवाई टाळण्याच्या प्रयत्नात असल्याचे नागरिकांतून समजत आहे.