विधवा महिलेला दागिने मोडायला लावणारा मंडळ अधिकारी कोण ?

0 370

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे  येथील एका महिलेचा पतीचे निधन झाले त्यानंतर काही तांत्रिक वादामुळे जमिनीचे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने त्यावर सुनावणी झाली व काही कालावधी मध्ये त्यावर कोर्टाने नोंद लावून घेण्याचा निकाल दिला . संबंधित महिलेने त्या निकालावर सातबाऱ्यावर नोंद लावण्यासाठी त्या निकालाची ओरिजिनल नक्कल प्रत तलाठी मॅडम यांना दिली त्यांनी त्याची कायदेशीर नोंद नोंदणीसाठी पकडली मात्र चतुर मंडळ अधिकारी यांनी ती नोंद योग्य ते सबबीखाली नाकारली.

 मात्र सदर महिला याबाबत महिला तलाठी यांच्याकडे याबाबत सविस्तर माहिती विचारू लागताच त्यांनी सांगितले की मंडळ अधिकारी यांनी नोंद नाकारली आहे. त्याला मी काहीच करू शकत नाही त्यावर तलाठी मॅडम यांनी नवीन सर्कल आले आहेत त्यांची भेट घ्या असा मोलाचा सल्ला दिला.  त्यावर सदर महिलेने मंडळ अधिकारी यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही नोंद पकडता येणार नाही असे सांगितले त्यावर सदर महिलेने काहीतरी करून ही नोंद लावा अशी विनवणी केली असता त्यांनी सांगितले ओटी भरावी लागेल अखेर तडजोड रक्कम ठरली 25 हजार रुपये त्यावर सदर महिलेने मंडळ अधिकारी यांना सांगितले की मी रोज 100 रु रोजाने कामाला जात आहे त्यातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही त्यावेळी पैंशे नाही तर नोंद होणार नाही असे त्यांनी सांगितले.
 त्यावर सदर महिलेने आपल्या कानातील फुले झुबे श्रीगोंदा शहरातील बोरा ज्वेलर्स यांच्या दुकानात सोने मोडले त्यातून त्या महिलेला 18 हजार 560रु मिळाले मग त्या महिलेने त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीकडून काही रक्कम उसनी घेतली आणि मंडळ अधिकारी यांना एकूण 25 हजार रुपये रक्कम देण्यात आली त्यानंतर मंडळ अधिकारी यांनी ती नोंद मजूर केली आणि त्यानंतर त्या विधवा महिलेचे व मुलाचे वारसांनी सातबाऱ्यावर नोंद करण्यात आली.
Related Posts
1 of 1,486
 नोंद झाल्यानंतर सदर महिलेने घडलेला सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते यांना सांगितलं त्यांनी याबाबत आवाज उठवत संबंधित मंडळ अधिकारी यांना विचारपूस केली असता संबंधित मंडळ अधिकारी यांनी सांगितले की प्रकरण वाढवू नका मला संगणक प्रणाली जमत नाही हाताखाली असलेल्या मुलाकडून नोंद मंजूर झाली आहे तरी मी घेतलेले सर्व पैंशे माघारी देतो असे त्यांनी सांगितले मग त्यांनी पैंशे घेतले कश्यासाठी असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
सरकारी पगार नाही का ? 
न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद पकडणे ग्राह्य असताना मेहेरबान मंडळ अधिकारी यांनी विधवा महिलेला दागिने मोडण्यासाठी का भाग पाडले त्यामुळे त्या मंडळ अधिकारी यांना सरकारी पगार नाही का ? याचीही सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: