DNA मराठी

अकोल्याच्या दंगलीला जबाबदार कोण?

सोशल मीडियावरील पोस्टवरून जुन्या शहरात दोन गटात संघर्षाचा भडका

0 286

Akola riots:- अकोला : सोशल मीडियावरील पोस्टवरून जुन्या शहरात दोन गटात संघर्षाचा भडका उडून त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. जुने शहर भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून, तणावपूर्ण शांतता आहे.

चक्क पतीने घेतला पत्नीच्या हाताला चावा
रविवारी प्रशासनाने सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक घेतली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नागपूर पोलिस क्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे यांनी दिले. बैठकीला जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, नागपूर पोलिस उपायुक्त राकेश कलासागर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. संचारबंदीमुळे मुख्य बाजारपेठ बंद होती, तसेच रस्त्यांवर शुकशुकाट होता. शनिवारी रात्री वस्त्यांमध्ये असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून जाळपोळ केली. ८ ते ९ घरांची नासधूस करीत, १५ दुचाकी जाळल्या. तसेच ९ चारचाकी वाहनांची तोडफोड करून जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वाहनमालकांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी दिली.

Related Posts
1 of 2,494

सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर झालेल्या दंगलीला जबाबदार कोण  जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण कठोर कारवाई होणार की जमवून केलेल्या मारहाणीत मृत्यू म्हणून आरोपी निर्दोष सुटणार ती पोलीस सखोल चौकशी करून आरोपींना शिक्षा होणार का पाहावे लागेल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: