‘त्या’ हिंसाचाराला जबाबदार कोण? शरद पवार म्हणाले , जेव्हा ..

0 181
Rajya Sabha election: Sharad Pawar's first reaction after the result, said Fadnavis ..
 
मुंबई –    २०१८ साली पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार (violence) प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज ५ मे रोजी त्यांनी या प्रकरणात चौकशी करत असलेल्या आयोगासमोर साक्ष नोंदवली आहे.  चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जय नारायण पटेल आणि सदस्य सुमित मलिक यांच्यासमोर त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे.
Related Posts
1 of 2,357

‘जेव्हा एखादी जबाबदार व्यक्ती कोणतंही वक्तव्य करते तेव्हा जबाबदारीचे भान ठेवून असे वक्तव्य करणे आवश्यक असते. अन्यथा त्या वक्तव्यातून जी काही प्रतिक्रिया उमटेल त्याची जबाबदारी त्या व्यक्तीला टाळता येणार नाही. आपल्या वक्तव्यात किंवा भाषणात चिथावणी देणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे काही नसावे, समाजातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवणारे काहीही नसावे, याची खबरदारी त्या व्यक्तीने घेणे आवश्यक आहे. निदर्शने, आंदोलने यासाठी लोकांच्या सोईची जागा निश्चित केली तर योग्य होईल, जेणेकरून आंदोलन हिंसक झाले तर कायदा- सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना नियंत्रण ठेवणे शक्य होईल,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमधील हिंसाचाराला जबाबदार कोण?

कोरेगाव-भीमा हिंसाचार घटनेनंतर ३ जानेवारी २०१८ रोजी प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद पुकारला. त्यात हिंसाचार होऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, याला कोण जबाबदार आहे, असे तुम्हाला वाटते? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मला त्याबाबत काही बोलायचे नाही, असं उत्तर पवार यांनी दिलं आहे.

 

‘कोणत्याही शांततापूर्ण आंदोलनाच्या वेळी कायदा-सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्या शांततापूर्ण आंदोलनात कोणतेही समाजकंटक, असामाजिक तत्वे घुसत असतील तर त्यांना रोखण्याची जबाबदारीही पोलिसांना टाळता येणार नाही,’ असंही शरद पवार म्हणाले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: