फ्लेचर पटेल कोण आहे? नवाब मलिकांचा पुन्हा एनसीबीवर आरोप

0 198

नवी मुंबई –  मागच्या काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) एनसीबी (NCB) वर टीका करत आहे. आज परत एकदा नवाब मलिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत त्यांनी एनसीबीला प्रश्न विचारले आहे. फ्लेचर पटेल कोण आहे? अशी विचारणा नवाब मलिक यांनी एनसीबीला केली आहे. (Who is Fletcher Patel? Nawab Malik again accuses NCB)

मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये एनसीबीला अनेक प्रश्न विचारले आहे कि मनिष भानुशाली याने मी खबरी असल्याचं सांगितलं. गोसावी हा फरार आरोपी आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत २ तारखेच्या आधी आपण त्यांना ओळखत नव्हतो असं सांगितलं. स्वतंत्र पंच असल्याचं एनसीबीने सांगितलं असून मी त्याबाबतीत आज प्रश्न उपस्थित करत आहे. एनसीबीने हा फ्लेचर पटेल ( Fletcher Patel)  कोण आहे याचा खुलासा करावा. समीर वानखेडे यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत ते फोटो टाकत आहेत. माय लेडी डॉन सिस्टर नावाने टॅग करत आहेत. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे?, अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. फ्लेचर पटेल यांच्या प्रसिद्धीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप लावत , शर्लिन चोप्राने दाखल केला FIR

Related Posts
1 of 1,494

“कोणतीही केस उभी करायची असते तेव्हा ज्या ठिकाणी घटना घडते तेव्हा तेथील प्रतिष्ठीत नागरिक, आजुबाजूची लोक यांना बोलवून पंचनामा करणं कायदेशीर तरतूद आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.“समीर वानखेडे यांच्याशी फ्लेचर पटेलचे काय संबंध आहेत? ही लेडी डॉन कोण आहे? फ्लेचर पटेल त्यांच्यासोबत कुठे कुठे जात आहेत? मुंबईत असं कोणतं रॅकेट सुरु आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनसोबत फिल्म इंडस्ट्रीत काय दहशत निर्माण करत आहेत? दहशत निर्माण करुन पैसे उकळले जात आहेत का?,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे.

“गेल्या एक वर्षातील माहिती घेतला असता एनसीबीने तीन केसेसमध्ये स्वतंत्र पंच म्हणून फ्लेचर पटेल यांचं नाव आहे. याचा अर्थ स्वतंत्र पंच यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ही कारवाई ठरवून केली असल्याचं हे यातून स्पष्ट होत आहे. कोर्टाने अनेकदा स्वतंत्र पंच अनेक केसमध्ये असल्यास यात तथ्य नाही असा निष्कर्ष काढला आहे. याचा अर्थ एनसीबीच्या माध्यमातून फर्जीवाडा सुरु आहे,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. फ्लेचर पटेल तीन केसमध्ये स्वतंत्र पंच कसे झाले याचं उत्तर दिलं जावं अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.(Who is Fletcher Patel? Nawab Malik again accuses NCB)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: